Header Ads

  • ताजा खबरें

    श्री शनैश्वर मंदिर बैरेज रोड येथे दत्त जयंती उत्सव सोहळा

    बदलापूर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  बदलापूर उपशहराध्यक्ष संजय पुजारी व सोनिया पुजारी यांनी दि. २२ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त बदलापूर पश्चिम बैरेज रोड, सागर गंगा बिल्डिंग शेजारी श्री श्नेश्वर मंदिर याठिकाणी दत्त जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी ६ ते ७ अभिषेक महाआरती, त्यानंतर रात्री ९ पर्यंत तीर्थ प्रसाद तसेच सायंकाळी ७ ते ८ पर्यंत भजन संध्या होणार आहे. तरी जास्तीत जास्त भक्तांनी व नागरिकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी  यावे असे आव्हान पुजारी यांनी केले आहे. 

    दैनिक बदलापूर विकास चे संस्थापक व संपादक डॉ. जगन्नाथ कामत व भाजपाचे माजी शहर अध्यक्ष जयवंत मुठे ह्या दोन शनि भक्तांनी एकत्रित येऊन बदलापूर पश्चिम बैरेज रोड याठिकाणी  श्री शनैश्वर मंदिराची स्थापना केली असून दर शनिवारी याठिकाणी शनि भक्त शनि देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. शनि मंदिरासोबतच त्याठिकाणी  गणपती बाप्पा, हनुमान, दत्त महाराज व इतर देवीदेवतांची देखील मूर्ती प्राणप्रतिष्ठापना  करण्यात आले आहे.बदलापूर, अंबरनाथ, कल्याण,  उल्हासनगर,टिटवाळा, पालघर, मुरबाड व विविध शहरातील भक्तगण या मंदिराला भेट देत असे. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad