कर्जत तालुक्याला डॉक्टरांची पदे भरली जावीत यासाठी आमदार लाड यांचे 2 जानेवारी पासून उपोषण...
कशेळे येथील महाआरोग्य मेळाव्यात केले जाहीर
नेरळ- कर्जत तालुक्यात वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरण्याचे मागणीसाठी आमदार सुरेश लाड हे 2 जानेवारी रोजी उपोषणाला बसणार आहेत.त्या बद्दल माहिती आमदार लाड यांनी कशेळे येथे आयोजित महाआरोग्य मेळाव्यात जाहीर कार्यक्रमात केली.आमदार सुरेश लाड यांनी महाआरोग्य मेळाव्यात बोलताना कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त आहेत.मात्र अनेक वर्षे मागणी करून देखील आरोग्य संचालक आणि आरोग्य उपसंचालक यांच्याकडून काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत.त्यामुळे कर्जत सारख्या आदिवासी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला वेळेवर मिळत नसलेली आरोग्य सेवा ही आमच्या सारख्या राजकारणी लोकांची मोठी खंत आहे.त्यामुळे आपण या देशासाठी हुतात्मे झालेले भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना अभिवादन कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर कर्जत येथे उपोषण सुरू करणार आहेत.तशी घोषणा आमदार लाड यांनी जाहीर कार्यक्रमात आणि ती देखील जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समोर केल्याने एकच खळबळ माजली.

No comments