भिवंडी निजामपुर शहर महापालिकेच्या प्रभाग क्र. 5 मध्ये स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा
सांडपाणी घरात शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
भिवंडी- संपुर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान जोमाने सुरु असतांना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी निजामपुर शहर महापालिकेला स्वच्छता अभियानाने काहीही एक घेणे देणे नसल्याचे दिसत आहे. भि.नि.शहर महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. 5 मध्ये झोपडपट्टी वस्तीत घाणीचे साम्राज्य तसेच सांडपाणी घरात शिरल्याची घटना घडली आहे. या झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी प्रशासनाकडे ही समस्या लक्षात आणुन दिल्यानंतर सुद्दा प्रशासनाकडुन तसेच प्रभाग समिती क्र. 5 चे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी गोरगरिबांच्या महत्वाच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्र. 5 मध्ये चार नगरसेवक आहेत परंतु 4 ही नगरसेवकांना या समस्येचा विसर पडला असुन निवडणुकीपुर्ते आम्हा झोपडपट्टीतील मतदारांचा फक्त वापर करण्यात आल्याचे तेथील रहिवाशी नगरसेवकावर आरोप करत आहेत.
स्थानिक नगरसेवक व प्रशासन कोणीही या गोष्टीकडे गांभिर्याने विचार न करत असल्याने शेवटी तेथील रहिवाश्यांनी सांडपाणी ने तुंबलेली गल्ली, आजुबाजुला घाणीचे साम्राज्य या सर्वांचा व्हिडीओ शुट करुन सोशल मिडिया फेसबुकवर पोस्ट केले. तसेच रहिवाश्यांनी या व्हिडीओ मध्ये प्रशासनाकडे तसेच रेहाना मैडम कडे सांगुन सु्द्धा कोणीही समस्येची दखल घेत नसल्याचे ही व्हिडीओ मध्ये म्हटले आहे. पाहणी करण्यासाठी आलेले जाधव परिसराची दशादिशा बघुन तसेच नागरिकांचा वाढता रोष पाहुन त्यांनी तेथुन पळ काढला.
विशेष म्हणजे जागोजागी घाणीचे साम्राज्य तसेच घराच्या आतपर्यंत सांडपाणी शिरल्याने त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात असल्याने भिवंडी निजामपुर शहर महापालिकेचे आयुक्त यांनीच आता स्वतः या समस्येकडे लक्ष देऊन समस्या सोडवत गोरगरिब रहिवाश्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणार्या दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी अशी तेथील नागरिकांनी मागणी केली आहे.

No comments