अपेक्स हॉस्पिटल समूहातर्फे मुंबईत मोफत अँजिओग्राफी व मार्गदर्शन शिबीर
मुंबईत रोज हृदयविकाराने ४० जणांचा मृत्यू
मुंबई- "अरे कालच तो माणूस मला भेटला आणि आज कळले के तो हार्टअटॅकने गेला" हे वाक्य न ऐकलेली व्यक्ती मिळणे आजच्याघडीला तरी अशक्य आहे.आपल्या माहितीतील, दूरच्या नात्यातील अथवा शेजाऱ्यांच्या परिचयातील एखादी तरुण तर कशी वयस्कर व्यक्ती अचानक हृदयविकारामुळे गेल्याची बातमी आपल्या कानावर अधूनमधून येत असते व आपणही थोडावेळ दुःखी होतो व काही दिवसात आपण ही घटना विसरून जातो. मुंबईतील धावत्या जीवनशैलीमुळे खाण्या पिण्याच्या व झोपण्याच्या वेळा नकळत बदलतात व चोर पावलांनी हृदयविकार अनेकांच्या आयुष्यात दाखल होतो. २०१५ च्या आकडेवारीनुसार मुंबईत दर दिवशी ४० नागरिकांचा हृदयविकाराने मृत्यु होतो व हा आकडा आजमितीला नक्कीच वाढल्याची चिंता आरोग्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे. हृदयविकाराविषयी जनजागृती करण्याच्या सामाजिक जाणिवेतून बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाने नवीन वर्षाचे औचित्य साधून मोफत हृदयविकार तपासणीतसेच अँजिओग्राफी व तज्ञ डॉक्टरांतर्फे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले असून या शिबीरात भाग घेण्यासाठी ९८२०३३२५१५ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदविणे अनिवार्य आहे. याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल समूहाच्या संचालिका डॉ संगीता शहा म्हणाल्या, " हृदयविकार हा श्रीमंतांचा आजार आहे ही चुकीची मानसीकता समाजात असल्यामुळे भारतामध्ये हृदयरोग्यांची संख्या वाढत आहे. उगाचच घाम येणे, विशेषत: तळहात घामेजून जाणे आणि चक्कर आल्यासारखे वाटणे ही सुद्धा हृदय विकाराची प्राथमिक लक्षणे समजावी. अपचन, हात दुखणे किंवा हात आखडणे, जबडा दुखणे या गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे अनेकजण हृदयविकाराला बळी पडत आहे.आपण सारेच हा प्राणघातक आजार बाळगत असतो. आपले हृदय कितपत प्रभावित झालेले आहे याची आपल्याला कल्पना नसते आणि मग आपण आपल्या शरीराने दिलेल्या पूर्व संकेतांकडे पुरेसे लक्ष देण्यात अपयशी ठरतो. याकरता अँजिओग्राफी ही चाचणी हृदयविकाराचे योग्य निदान करू शकते. ही वैद्यकीय चाचणी व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आम्ही १५ जानेवारी २०१९ पर्यंत आम्ही मोफत करणार असून जास्तीत जास्त नागरिकानी याचा लाभ घ्यावा. "
अँजिओग्राफीसाठी ९ ते १५ हजार खर्च येतो व अनेक वेळा हा खर्च वाचविण्यासाठी ही तपासणी पुढे ढकलतात व हृदयविकाराला बळी पडतात अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
अधिक माहितीसाठी - उमेश भोगले - ९८२०३३२५१५

No comments