1 जानेवारी रोजी मुरबाडमध्ये महामॅरेथॉन स्पर्धा
मुरबाडः- नववर्षाच्या स्वागत दि. 1 जानेवारी रोजी मुरबाड येथे क्रीडासंस्कृतीने महामॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनाने होणार आहे. या स्पर्धेत पुरुष व महिलांचा सहभाग असणार आहे. मुरबाड ग्रामीण भागात ही शहरासारखे विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करुन नवपिढीमध्ये क्रीडेबद्दल उत्साह व आकर्षक निमार्ण व्हावा म्हणुन महामॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन केल्याचे टीडीसी बैंकेचे संचालक राजेश पाटील यांनी बदलापूर विकासशी बोलतांना सांगितले. 1 जानेवारी रोजी सकाळी 8.30 ते 11 वाजेपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत 14 ते 60 वयोगटातील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. मुरबाड तालुक्यात प्रथमच महामॅरेथॉन स्पर्धा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर स्पर्धक सहभागी होतील अशी आशा राजेश पाटील यांनी व्यक्त केली.

No comments