Header Ads

  • ताजा खबरें

    दि. 29 जानेवारी रोजी ब्राह्मण समाज मंडळ आयोजित अमर ओक यांनी रचनाबध्द केलेल्या गोल्डन फ्ल्यूट

    बदलापूरः- बदलापुर शहरातील रसिक श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा बदलापूर ब्राह्मण समाज मंडळाने दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध कलाकार अमर ओक यांनी रचनाबध्द केलेला गोल्डन फ्ल्यूट कार्यक्रमाचे आयोजन दि. 19 जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता बदलापूर पूर्व गांधी चौक येथील कु.ब.न.प. मराठी शाळेच्या पटांगणात सदर कार्यक्रम होणार आहे. 
    गोल्डन फ्ल्यूट हे कार्यक्रम पुर्णपणे बासरीवर आधारीत असलेले कार्यक्रम आहे. बासरीने हिंदी चित्रपट संगीतात घडविलेले सुवर्ण युग हे या कार्यक्रमामार्फत बदलापुरच्या रसिक श्रोत्यांसमोर साक्षात उभे राहणार आहे. गोल्डन फ्ल्युट हे चित्रपट संगीताच्या रचनांमध्ये बासरीचा चपखल वापर करणार्या संगीतकारांचे स्मरण असल्याने बदलापुरच्या रसिकश्रोत्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहुन गोल्डन फ्ल्युट या स्मरणरंजन कार्य्रक्रमाचे साक्षीदार व्हावे असे बदलापूर ब्राह्मण समाज मंडळाच्या वतीने सर्वाना आवाहन करण्यात आले आहे. 
    सदर कार्यक्रमाच्या प्रवेश तिकीट तथा पासेसची विक्री सुरु झाली असुन १५० ते २००० पर्यंत तिकीट दर असुन बदलापूर शहरातील पुढील 5 ठिकाणी तिकीट खरेदी करता येईल.  
    तिकीट मिळण्याचे ठिकाणः 
    1) आपटे ट्रॅव्हल्स, गांधी चौक, बदलापूर (पूर्व) 
    2) चितळे पौष्टीक, देवधर मार्केट, बदलापूर (प.) 
    3) प्रशांत (आण्णा) कुलकर्णी यांचे निवासस्थान, बैरेज रोड, बदलापूर (प.) 
    4) चितळे आईस्क्रीम, सदगुरु प्लाझा, शॉप नं. 5, अनंत हलवाई जवळ, जाधव कॉलनी, बदलापूर (प.)
    5) लिबर्टी ट्रॅव्हल्स, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, बदलापूर (पूर्व). 
    अधिक माहितीसाठी संपर्क - अण्णा कुलकर्णी 9762471763, महेश जोशी 7666111335, प्रद्युम्न परांजपे 9960824008, गणेश भागवत 7447655156 व मनोज मोगरे 9223305251.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad