नाताळ व नुतन वर्षानिमित्त अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे स्तुत्य उपक्रम
अंबरनाथ (बदलापुर विकास मिडिया)- नाताळ सण साजरा करण्यासाठी तसेच नुतन वर्ष 2019 च्या शुभेच्छा देण्यासाठी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ, अंबरनाथ च्या वतीने अंबरनाथ शहरातील गोरगरिब तसेच बेघरांना गोदडी, शॉल, चारीचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या सोबत जेवण करुन नववर्षा निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आले.
वाचा - आर्थिक परिस्थितीमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लुनार फाऊंडेशन सामाजिक संस्था कार्यरत
अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ ही एक सामाजिक संस्था असुन अंबरनाथ शहरात विविध सामाजिक कार्य करुन लोकांना निःस्वार्थ भावनेने मदत करत असते. अंबरनाथ मधील शेकडो ख्रिश्चन बांधव या संस्थेला जुडलेले असल्याने विविध समाजकार्य यशस्वीरित्या केले जाते असे अजिंक्य लोंढे यांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले.
No comments