Header Ads

  • ताजा खबरें

    सोशल मिडिया चा दणका व रुग्णमित्राच्या प्रयत्नामुळे त्या दिव्यांग महिलेला मिळाली अंतोदय शिधापत्रिका

    रेशनिंग ऑफिसला फेऱ्या मारून झाली जखम बुटाला सुद्धा पडले होल

    उल्हासनगर (बदलापूर विकास मिडिया):-  दिव्यांग महिलेने जनसेवा कार्यालयात मांडली आपली व्यथा  शिधावाटप  कार्यालयात एक दिव्यांग महिला पिवळी शिधावाटप पत्रिका मिळवण्यासाठी 2 महिन्या पासून फेऱ्या मारत असून त्यामुळे तिच्या पायाला जखमा झाल्या असून सतत चालत येत असल्याने बूट देखील फाटला आहे.

    वाचा - रेल्वेत भरती, विविध पदांकरिता निघाली भर्ती, 35 हजार पगार


    त्या दिव्यांग महिलेने  उल्हासनगर 4 येथील जनसेवा कार्यालयात तिने रुग्णमित्र भरत खरे याना आपल्या पायाची जखम दाखवून मदत मागितली. खडगोलवली ,नित्यानंद कॉलनी येथील शम्मी सुरेंद्रसिंग चौरसिया ही महिला आपले दिव्यांग पती व लहान मुलां  समवेत राहत आहे. ती लहान असताना तिचा डावा पाय अपघातात गमावला असल्याने तिने दिव्यांग सुरेंद्रसिंग सोबत विवाह केला तिला एक मुलगा असून तिने दोन महिन्या पूर्वी आपल्याला पिवळी शिधापत्रिका मिळणे कामी उल्हासनगर 5 येथील कार्यालयात  अर्ज सादर केला.  तिने सर्व प्रक्रिया पूर्ण करून आपल्या उत्पन्नाचे बाबत अफेडीव्हीट सुद्धा जमा केले पण निरीक्षक व शिधावाटप अधिकारी यांनी 15 हजार च्या आत वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणल्याशिवाय पिवळी शिधापत्रिका मिळणार नाही असे सांगून तिला कोणतीही मदत देण्याचे नाकारले. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच शिधावाटप प्रशासन खडबडुन जागे झाले. आणि ही बाब रुग्णमित्र भरत खरे यांनी प्रभारी शिधावाटप अधिकारी सोनार यांच्या निदर्शनास आणून देत तिच्या परिस्थिती ची जाणीव करून दिली अवघ्या 2 दिवसात तिच्या हातात पिवळी शिप पडल्यावर तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले दिव्यांग शम्मी चौरसिया ने आज जनसेवा कार्यालयात येऊन भरत खरे यांचे आभार मानले.

    आता बदलापूर विकासच्या बातम्या इंग्रजी वाचकांसाठीही उपलब्ध, बातम्यांच्या लिंकवर किल्क कर -
    Vote for Sai Vineet Joshi to make her the Royal singer...
    - MLA Kisan Kathore's presence at Shiv Sena corporator...
    - Badlapur station to Shashwat Park - Deepali stand...
    - Shiv Sena's MLA can be elected even if the candidate...
    - Finally, the campaign against anti-encroachment began...
    - Nationalist party to observe indefinite hunger strike...
    - ‘Michael's gambling den’ in Murbad municipality building...
    Kharvai handcart mafias causing chaos in the Badlapur city...

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad