Header Ads

  • ताजा खबरें

    ठेकेदार भरत नवगिरेच्या डंपरने दिली पार्क असलेल्या चारचाकी वाहनाला धडक : नुकसान भरपाई न दिल्याने प्रकरण न्यायालयात जाणार

    पोलिस, राजकारणी कोणीही सहकार्य करत नसल्याचा पिडीत महिलेचा आरोप
    बदलापुर शहरातील राजकारण्यांमध्ये माणुसकी मेल्यात जमा!
    "स्वागत आहे तुमचं... बदलापुरच्या निच राजकारणी शहरात"
    बदलापुर (बदलापूर विकास मिडिया):- छ. शिवाजी महाराज आपले घोडे बदलण्यासाठी म्हणुन बदलापुरात यायचे अश्याने या शहराला नाव पडले बदलापूर शहर परंतु आज बदलापुर नाव "बदला" घेणारा "पुर" (शहर) असल्याचे सर्वत्र म्हटले जाते. "ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपैय्या" हे सकाळ संध्याकाळ जपणारे बदलापुर शहरातील त्या "दळभद्री" राजकारण्यांमुळे आज बदलापुरकरांचा राजकारण्यांवरील विश्वासच उडाला आहे. पैसा आणि स्वतःचा फायदा याव्यतिरिक्त दुसरे काही दिसत नसल्याने कुटनिती ते निच राजकारण पर्यंत आपला थर झुकावणार्या राजकारणार्यांमुळे शहरातील नागरिकांना "बदलापुरच्या निच राजकारणात आपले स्वागत आहे" असे म्हणायची वेळ आली आहे.
    नुकताच बदलापूर पूर्व नारीस् साडीज् च्या संचालिका सौ. रोहिणी राजु वाघमारे यांच्या एमएच 05 बीएल 4783  गाडीला कु.ब.न.प. च्या कॉन्ट्रक्टरच्या डंपरने एमएच 05 0887 धडक दिली. भरत नवगिरे असे त्या ठेकेदाराचे नाव असुन त्याचीच ही डंपर असल्याचे सुत्रांकडुन समजते. विशेष म्हणजे पिडीत महिलेची चारचाकी वाहन ही योग्य ठिकाणी पार्क होती. निष्पाप महिलेच्या गाडीचे मोठे नुकसान झाले, सदर महिलेने याबाबत पोलिसात तक्रार करण्यासाठी गेल्या परंतु त्याठिकाणी आदीच निच राजकारण करणारे राजकिय नेत्यांनी आपले फोन फिरविले होते म्हणुन तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ झाली. त्यानंतर पिडीत महिलेने न्याय मिळण्यासाठी अनेक राजकारण्यांना झालेला प्रकार लक्षात आणुन दिले परंतु कोणीही त्या महिलेला न्याय मिळवुन देण्यास तैयार नव्हते. विशेष म्हणजे काही राजकारण्यांनी तर सरळ आम्ही प्रयत्न करतो पण तुम्ही पोलिसात तक्रार करु नका असा फालतुचा सल्ला देत ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम केले. अनेक दिवसांपासुन त्या महिलेने अनेकांना संपर्क केले परंतु एकही राजकिय नेता किंवा पुढारी जो इतर वेळी समाजसेवक असल्याचा बनाव करुन "बदलापुरच्या जनतेची खुप काळजी आहे" हे खोटेनाटे दिखावे करतो त्या कोणीही मदत करण्यास पुढाकार घेतला नाही. हे सर्व पाहुन शिवसेनेचे दत्ता गायकर तसेच समाजसेवक अॅड. तुषार साटपे यांनी पिडीत महिलेला संबंधीत ठेकेदाराने नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणी केली होती यांच्यावरही पुढे जाऊन दबाव आणण्याचा काम काही विशिष्ट राजकिय नेत्यानी करत ठेकेदाराला वाचविण्याचे काम केल्याने बदलापुरकरांचे राजकिय नेत्यांना काही एक पडलेले नाही हे मात्र स्पष्टपणे दिसुन आले.

    वाचा - रेल्वेत भरती, विविध पदांकरिता निघाली भर्ती, 35 हजार पगार


    सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना अंबरनाथ तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी यांच्याकडे सुद्धा सदर महिलेचे प्रकरण गेले होते व त्यांनी सुद्धा पिडीतेला भरपाई मिळवुन देण्यासाठी ठेकेदाराशी बोलुन प्रयत्न करतो असे आश्वासन दिले होते परंतु नंतर त्यांचेही आश्वासन फक्त आश्वासनच राहीले. 
    एक निष्पाप महिला, ज्यांच्या गाडीचे नुकसान झाले, त्या न्यायाच्या प्रतिक्षेत्र दरदर भटकत राहिल्या परंतु बदलापुर शहरात कोणत्याही राजकारण्याने पुढाकार घेऊन त्यांचे झालेल्या नुकसानीचे भरपाई संबंधीत ठेकेदाराकडुन मिळवुन देण्यासाठी मदत तर सोडाच साधे मार्गदर्शन सुद्धा केले नाही. ज्यामुळे आपल्या बदलापुर शहरात दिवसेंदिवस राजकारण्यांची माणुसकी सामान्य नागरिकांच्या प्रती मरत चालली आहे असे आता बदलापुरकरांना वाटत आहे.
    ठेकेदार भरत नवगिरे हा ठेकेदारी सोबतच शिवसेना पक्षात कार्यरत असल्याने बदलापुरातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी त्याच्या विरोधात जाऊन खर्याची बाजु मांडण्यात रस दाखविले नाही. तुषार साटपे आणि दत्ता गायकर व्यतिरिक्त कोणीही काही बोलण्याचे धाडस सुद्धा केले नाही. पण इथे फक्त शिवसेनेच्या त्या पदाधिकार्यांवर बोट ठेवण्यापेक्षा भाजपा व इतर विरोधी पक्षातील राजकारण्यांनी तरी काय मोठे तीर मारले. हे सर्व पाहुन एक मात्र स्पष्ट होते कि जनतेसमोर सर्व पक्ष एकमेकांशी जोरदार भांडत असले व त्याला "समाज हिताय" नाव देत असले तरी खर्या अर्थाने "आम्ही सर्व भाऊ मिळुन वाटुन खाऊ" हिच प्रवृत्ती बदलापुरातील राजकारण्यांमध्ये असल्याचे बोलले जाते आहे. म्हणुन बदलापुर शहरातील जनतेला "आपले स्वागत आहे बदलापुरच्या निज राजकारणी शहरात" असे म्हणण्याची वेळ नक्की येणार. 
    शेवटपर्यंत कोणीही न्याय मिळवुन देण्यासाठी पुढाकार घेतला नाही म्हणुन शेवटी त्या पिडीत महिलेने आपल्या कष्टाचे पैसे खर्च करुन स्वतः ती गाडी दुरुस्त केली असुन 2 लाख रुपयांचा त्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागला.
    पीडित महिलेने आता हे प्रकरण न्यायलयात घेऊन संबंधीत ठेकेदाराविरोधात याचिका दाखल करणार आल्याचे सांगितले असुन मा. कोर्टातुनच "त्या" आता झालेल्या नुकसानीचे भरपाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले.
    आज ज्याठिकाणी सौ. रोहिणी ह्या पीडित महिला विनाकारण अडचणीत सापडल्या आहेत त्याठिकाणी उद्या अजुन कोणी बदलापुरकर देखील दिसु शकतो हे बदलापुर शहरातील तमाम जनतेने लक्षात असुद्या. बदलापुरात ह्या ठेकेदारांच्या तसेच नगरपालिकेच्या टेंडरच्या पैश्यावर जगणारे ठरावीक राजकारणी हे कधी तुम्हा बदलापुरकरांना निःस्वार्थ भावनेने मदत करतील याची खात्री ठेऊ नाही म्हणुन आज ही घटना बदलापुरच्या प्रत्येक नागरिकाने आपल्या स्मरणात ठेवत बदलापुर शहरात किती निच राजकारण केले जाते हे लक्षात ठेऊन भविष्यात आपल्या विभागात नगरसेवक निवडतांना दोनदा विचार करावा असे दै. बदलापुर विकासचे कार्यकारी संपादक महेश कामत यांनी बदलापुरच्या जनतेला आवाहन केले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad