Header Ads

  • ताजा खबरें

    प्रियेसीच्या नादात लग्न केलेल्या बायकोचा केला छळ ; बदलापुर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    पगारावर डल्ला मारण्यासाठी केले होते लग्न -पत्नीचा आरोप
    पत्निचा छळ करणारा कुणाल नंदकुमार भुर्के, बदलापूर
    बदलापूर (बदलापूर विकास मिडिया):- सुशिक्षित आणि आईटी कंपनीत काम करणार्या कुणाल भुर्के ने नुकताच एका मुलीसोबत अरेंज मैरेज केले. लग्न हे दोघांच्याही मर्जीने झाले असल्याने कोणावरही दबाव नव्हता. थाटामाटात लग्न केल्यानंतर प्रतिभाला (बदललेले नाव) तिच्या नवर्याने बदलापुरात आणले. लग्नाच्या काही दिवसांनंतरच कुणालचे हावभाव तसेच इतर गोष्टीं विषयी प्रतिभाला शंका निर्माण झाली परंतु नवर्यावर विश्वास ठेऊन त्या गोष्टींकडे तीने दुर्लक्ष केले, परंतु काहीच दिवसात प्रतिभाला समजले की कुणाल भुर्के एका परस्त्रीसोबत विवाहबाह्य संबंधात असुन लग्नापुर्वीपासुन अफेअर चालु असल्याचे तिच्या लक्षात आले. संसार टिकविण्यासाठी प्रतिभाने अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, अनेकदा कुणालला समजविण्याचा प्रयत्न देखील केला परंतु कुणाल भुर्केने बायकोवर प्रेम करत सौंसार चांगल्याप्रकारे चालिवण्याऐवजी आपल्या आई सौ. नैयना नंदकुमार भुर्के व वडिल नंदकुमार भुर्के सोबत तिचा छळ करायला सुरुवात केली. दररोज तिघांकडुन छळ होत असल्याने शेवटी कंटाळुन प्रतिभाने बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविले असुन भादवि कलम 498 ए, 504 प्रमाणे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    "सौंसार टिकविण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले परंतु प्रेयसीच्या चक्कर मध्ये कुणालने मला कधी बायको म्हणुन स्विकारलेच नाही, प्रोजेक्ट व मिटींगचा बहाणा करुन आऊटऑफ जायचे असे सांगुन प्रियसीच्या घरात तिच्या आईची परवानगी घेऊन तिला फिरवु लागला व याबाबत विचारणा केले असता त्याने मला छळण्यास सुरुवात केली. मी शासकिय विभागात सर्विसला असल्याने फक्त माझ्याकडून पगाराचे पैसे मागतांनाच कुणाल माझ्याशी गोड बोलायचा त्यानंतर पुन्हा तो आपल्या खरा रुपात यायचा" असे प्रतिभाने बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले.
    पिडीत महिला रेल्वेत कामाला असुन तिच्या पगारावर डल्ला मारण्यासाठीच कुणाल भुर्केने लग्न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल जरी झाला असला तरी अद्याप सदर महिलेचे स्त्रीधन तिला देण्यात आले नसुन ते मिळविण्यासाठी तसेच दोषींविरोधात कठोर कारवाईसाठी प्रतिभा आता दिवाणी न्यायालयात जाणार असल्याचे समजते.

    आता बदलापूर विकासच्या बातम्या इंग्रजी वाचकांसाठीही उपलब्ध, बातम्यांच्या लिंकवर किल्क कर -
    Vote for Sai Vineet Joshi to make her the Royal singer...
    - MLA Kisan Kathore's presence at Shiv Sena corporator...
    - Badlapur station to Shashwat Park - Deepali stand...
    - Shiv Sena's MLA can be elected even if the candidate...
    - Finally, the campaign against anti-encroachment began...
    - Nationalist party to observe indefinite hunger strike...
    - ‘Michael's gambling den’ in Murbad municipality building...
    Kharvai handcart mafias causing chaos in the Badlapur city...

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad