Header Ads

  • ताजा खबरें

    सिडको व एमएमआरडीएची चिर्लेगाव, उरण येथे अनधिकृत बांधकामविरोधी संयुक्त कारवाई

    मा. उच्च न्यायालयाच्या सन 2012 च्या याचिका क्र. 138 वरील आदेशानुसार सिडको किंवा महाराष्ट्र शासनाकडून कोणताही विकास परवाना न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश न्यायालयामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार श्री. शिवराज एस. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी  (निवडश्रेणी) तथा मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक (दक्षिण) यांच्या पथकाने दि. 21 डिसेंबर, 2018 रोजी मुंबई पारबंदर जोडरस्ता (एमटीएचएल रो), एन.एच.4बी लगतच्या चिर्लेगाव, उरण येथे अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईचे आयोजन केले होते. सदर कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे :
    चिर्लेगाव, उरण येथे 26 हेक्टर क्षेत्रावर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेला 1 ढाबा, 2 गोडाऊन्स, 3 पत्रा शेड, 1 गॅरेज इ. बांधकामे निष्कासित करण्यात येऊन उपरोक्त क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. 
    उपरोक्त नमूद अतिक्रमणे-अनधिकृत बांधकामे ही सिडकोच्या मालकीच्या भूखंडांवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क आणि विकासाची परवानगी नसताना, सिडकोच्या प्रचलीत नियमावली व धोरणांचा भंग करून उभारण्यात आली होती व सिडको प्रशासनाने योग्य ती कायदेशीर प्रकिया अवलंबून ही अतिक्रमणे निष्कासित केली. 
    सदर कारवाई उरण पोलीस स्थानकातील श्री. एन. बी. कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व 40 पोलीस कर्मचारी यांच्या सहाय्याने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. सदर कारवाई पार पाडतेवेळी एमएमआरडीए प्राधिकरणाचे 4 अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. सिडकोतील एमएसएफ कर्मचारी व सुरक्षा रक्षक हेही या कारवाईवेळी उपस्थित होते. 
    सदर कारवाई पार पाडताना 10 कामगार तैनात करण्यात येऊन 1 जेसीबी व 1 ट्रक या साधनांचा वापर करण्यात आला. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad