Header Ads

  • ताजा खबरें

    25 हजाराची लाच घेतांना क.डो.म.प. प्रभाग लाचखोर अधिकारी शरद रामचंद्र पाटील रंगेहाथ पकडले

    अनधिकृत्त चाळींवर कारवाई न करण्यासाठी घेतली लाच ; ए.सी.बी. ठाणे ची कारवाई 
    कल्याणः- भ्रष्ट अधिकार्यांचा माहेर घर म्हणुन ओळखल्या जाणार्या कल्याण डोंबिवली महापालिकेत अजुन एक लाच खोर आज ठाणे एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. शरद रामचंद्र पाटील असे या अधिकार्याचे नाव असुन हा लाचखाऊ  प्रभाग समिती क्र 9 आय वार्डचा प्रभागक्षेत्र अधिकारी पदावर काम करत असे. एका बिल्डर कडुन माणेरे-चिंचपाडा येथे बांधकाम केलेल्या चाळी अनधित्त असुन त्यावर कारवाई न करण्यासाठी पाटील याने 80 हजार लाचेची मागणी केली होती. पिडीत डेव्हलोपर ने त्याची तक्रार एसीबी कडे केली. त्याप्रमाणे एसीबीने सापळा रचला व पहिला हफ्ता 25 हजार रुपयांचा कार्यालयीन कक्षात पाटील याने स्वीकारताना एसीबीने पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. एसीबी आता लाचखाऊ अधिकारी पाटील याची चौकशी करत आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad