Header Ads

  • ताजा खबरें

    कल्याण येथे डॉक्टर आणि मेडिकल चालकाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार

    डॉक्टर गजाआड मेडिकल चालक पसार

    कल्याण:~ कल्याण पूर्वेत क्लिनिक मध्ये काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर क्लिनिक मध्ये एका नराधम डॉक्टर ने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .धक्काददायक बाब म्हणजे या डॉक्टर च्या क्लिनिक च्या बाजूला असलेल्या मेडिकल चालकाणे डॉक्टर पिडितेसोबत दुष्कृत्य करत असतानाचा व्हिडियो तयार केला होता हा व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने देखील तिच्यावर लैंगिक अत्याचार केला .अल्पवयीन मुलीने याबाबत कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी नराधम डॉकटर ताज अन्सारी व मेडिकल चालक दिलदार शेख विरोधात गुन्हा दाखल करत डॉकटर ला बेड्या ठोकल्या तर मेडिकलचालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे   . डॉकटर ताज बोगस असलयाची प्रथमिक माहिती समोर आली आहे

    कल्याण पूर्वेकडील नेतिवली परिसारत डॉकटर ताज अन्सारी याचे हसन क्लिनिक सेंटर आहे .तर त्याच्या क्लिनिक च्या बाजूला दिलदार शेख  याचे मेडिकल आहे . ताज अन्सारी याचे हसन क्लिनिक सेंटर सदर पिडीत अल्पवयीन मुलगी काम करत होती .पिडीत अल्पवयीन मुलीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचा फायदा घेत ताज अन्सारी याने तिच्याशी अनेकदा लगट करण्याचा प्रयत्न करायचा मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपल्याला कामावरून काढून टाकतील या भितीने पिडीत मुलगी हा जाच सहन करत होती .त्यामुळे डॉक्टर अन्सारीची हिम्मत वाढली तिच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत त्याने काही महिन्यापूर्वी तिच्यावर क्लिनिक मध्ये लैंगिक अत्यचार केला .याबाबत कुठे वाच्यता केल्यास कामावरून काढून टाकेन व तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली .त्यानंतर अश प्रकारे धमक्या देत तो तिच्यावर लैगिक अत्याचार करत होता याची भनक शेजारी आलेल्या मेडिकल चालक दिलदार शेख याला लागली . त्याने देखील पिडीतेच्या असहाय्यतेचा फायदा घेत डॉक्टर व पिडीतेचा व्हिडियो तयार करत तिला हा व्हिडियो दाखवून बदनामीची धमक्या देत अंगलट करण्याचा प्रयत्न करू लागला त्यामुळे सदर पिडीत मुलगी घाबरली होती. सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून तिने याबाबत आपल्या कुटुंबाला माहिती देत थेट कोलशेवाडी पोलीस स्थानक गाठत या घडल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली. या तक्रारी नुसार पोलिसांनी नराधम डॉक्टर ताज अन्सारी व मेडिकल चालक दिलदार शेख विरोधात गुन्हा दाखल करत डॉकटर ताज अँसारी याला अटक केली तर मेडिकल चालक दिलदार शेख पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad