Header Ads

  • ताजा खबरें

    स्टार किड्स किंग्डम फॉउंडेशनचा ६ वा वार्षिक क्रीडामहोत्सव उत्साहात साजरा

    ठाणे: पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्टार किड्स किंग्डम फॉउंडेशन ह्या संस्थेच्या विटावा  व कळवा शाखेचा ६ वा  वार्षिक क्रीडामहोत्सव २३ डिसेंबर २०१८ रोजी उत्साहात साजरा झाला.
     सकाळच्या सत्रात विटावा शाखेचा क्रीडामहोत्सवाच्या वेळी कार्यक्रमास विटावा गाव क्षेत्रातील समाजसेवक  अविनाश पाटील, संस्थेचे अध्यक्ष  एकनाथ पवळे व चेअरमन  डॉ. गणेश जनार्दन घुगरे यांच्या उपस्थितीत  जितेंद्र व्ही. सोनावणे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले.
    स्टार किड्स किंग्डम या शाळेने अल्प कालावधीत शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून अल्पावधीत चांगले नाव कमावले आहे असे मनोगत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जितेंद्र व्ही. सोनावणे, न्यू इंग्लिश स्कूल, कळवाचे शारीरिक शिक्षण शिक्षक यांनी व्यक्त केले. तर मुलांच्या क्रीडा गुणांना कल्पकतेने व नाविन्यपूर्ण पद्धतींनी वाव देण्याचे कार्य संस्था यापुढेही करीत राहील असा विश्वास अविनाश पाटील यांनी व्यक्त केले आहे.
    संध्याकाळच्या सत्रात कळवा शाखेचा क्रीडा महोत्सव साजरा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय (अँथेलेटिक) पंच रमेश खारकर हे उपस्थित होते. "मुलांना खेळण्यासाठी पालकांनी रोज एकतास द्यावा." असे विचार खारकर सर यांनी मांडले. या कार्यक्रमाला नगरसेविका कु. प्रियांका पाटील, समाजसेवक विकास झंजाड, प्रदीप महाले डायरेक्टर ईएसपीम स्पोर्ट्स कंपनी, कुंभार सर, सकपाळ काका, इ. मान्यवर उपस्थित होते.
    या महोत्सवात सुमारे २०० लहान मुलांनी विविध क्रीडा प्रकार,  पाश्र्चात्य क्रीडा- नृत्य प्रकार उत्कृष्ट करून दाखविले. या महोत्सवात पालकांनी व इतर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विविध स्तरातील मान्यवर, राजकीय व्यक्ती, शिवाय शिक्षक व क्रीडा तज्ञांनी या समारंभात आवर्जून उपस्थिती लावली. विद्यार्ध्यांच्या बरोबर पालकांनी देखील विविध स्पर्धामध्ये भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्र संचालक शैला कदम, व कोमल म्हात्रे या शिक्षिकांनी केले.
    संस्थेच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील, दीपाली डेरे, ज्योती हिरे, संपूर्ण कर्मचारी वर्ग व विद्यार्थी-विद्यार्थिनी हा महोत्सव अत्यंत दिमाखदार पद्धतीने संपन्न केला. यामुळे शाळेच्या उल्लेखनीय कामगिरीचे विटावा गावाच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad