अंबरनाथ रिक्षा चालकांच्या मनमानीला आरटीओचा चाप ; शेअरींग भाडे 8 रुपये
अंबरनाथः- मुजोर रिक्षा चालकांना वठणीवर आणल्यानंतर आता आरटीओ ने आणखीन एक महत्वाचे पाऊल उचलले असुन अंबरनाथ रिक्षा चालकांच्या मनमानी भाडेवाढला चाप लावण्यात आला आहे.
नुकताच अंबरनाथ येथील रिक्षाचालकांनी मनमानी भाडेवसुली करण्यास सुरुवात केली होती, शेअरींगसाठी ज्याठिकाणी 10 रुपये भाडेदर आकारले जात होते ते वाढवुन 15 रुपये करण्यात आले. अश्याप्रकारे अचानक 5 रुपये वाढविल्याने तसेच ही भाडेवाढ मिटरच्या दरावर न वाढवता, फक्त शेअरींगमध्ये भाडेवाढ करण्यात आल्याने नागरिक तसेच प्रवाशी नाराज झाले होते. विशेष म्हणजे यासाठी रिक्षाचालकांनी आरटीओची देखील कोणतीही परवानगी घेतली नव्हती.
अखेर आरटीओ ने प्रवाशांच्या या समस्येकडे गांभिर्याने विचार करत रिक्षाचालकांच्या मनमानी भाडेवाढला चाप बसवत शेअरींगचे भाडे 10 रुपयांवरुन सरळ 8 रुपयांचा नविन दर पत्रक जारी केले आहे.
दिवसेंदिवस सामान्य नागरिकांचा तसेच प्रवाशांचा विचार करुन अंबरनाथ वाहतुक शाखा तसेच आरटीओ काम करत आहे त्याबद्दल अंबरनाथ व जवळपासच्या शहरातील नागरिकांनी - प्रवाशांनी आरटीओचे आभार मानले आहे.

No comments