Header Ads

  • ताजा खबरें

    ठाणे शहर हागणदारी मुक्त, केंद्राचे प्रमाणपत्र

    ठाणे(१९): केंद्र सरकारच्या पथकाने गेल्या महिन्यात केलेल्या फेरतपासणीअंती ठाणे शहर हागणदारीमुक्त असल्याची घोषणा केली असून ठाणे शहर हागणदारीमुक्त असल्याचे पत्र महापालिकेस नुकतेच प्राप्त झाले आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली टीम ठाणेने हागणदारी मुक्त योजना प्रभावीपणे राबविली आहे.
    केंद्र सरकारच्या त्रयस्थ संस्थेच्या पथकाने महापालिका क्षेत्रातील १७ ठिकाणाची दोन दिवसांपूर्वी आकस्मिक पाहणी केली होती. यामध्ये विटावा,शिवाजीनगर,गांधीनगर,समर्थनगर,वैतीबाई रामचंद्रनगर,रामबाग,पडवळनगर,रघुनाथनगर,वासुदेव बळवंत फडके मार्ग,कळवा मार्केट,खारेगाव मार्केट,शरीफा रोड, थिराणी विद्यामंदिर,शिवाई विद्यालय,आझाद इंग्लिश स्कूल, एसटी लौरेन्स स्कूल,डिसुझावाडी,कचराळी तलाव आदी ठिकाणांचा यामध्ये समावेश होता.या भागात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालचे पुरविण्यात आली आहेत.
       दर सहा महिन्याच्या अंतराने या त्रयस्थ पथकाकडून पाहणी केली जाते.त्यानुसार यापूर्वीही शहरातील काही भाग हागणदारी मुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad