वांगणी मध्ये प्रथमच वांगणी महोत्सव २०१८- २०१९चे आयोजन
वांगणी :- सध्या विविध शहरात विविध महोत्सवाचे आयोजन केले जाते परन्तु ठाणे जिल्ह्याच्या वांगणी शहरात आजवर कधी "वांगणी महोत्सव" चे आयोजन करण्याचा धाडस कोणी केला नाही, परन्तु आता वांगणी करांनाही आपल्या शहरात महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे, कारण वांगणी वार्ड क्र ४ चे स्थानिक समाजसेवक - उद्योजक सागर अशोक पारकर हे वांगणी पश्चिम श्रीनगर वार्ड क्र ४ विठ्ठल मंदिर पटांगणात "वांगणी महोत्सव २०१८-१९" चे आयोजन करणार आहेत.
दि २५ डिसेंबर ते ३ जानेवारी असे तब्बल १० दिवसांचे "वांगणी महोत्सव २०१८-१९" होणार आहे. या महोत्सवात आगरी, कोळी, कुणबी, मराठा, कोंकणी, मालवणी खाद्यपदार्थ, वास्तु तसेच खेळण्याचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.
वांगणी महोत्सव २०१८-१९ कार्यक्रमाचे दि २५/१२/२०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन करण्यात येणार, २७/१२/२०१८ रोजी महान मांगल्या महाराष्ट्र लावणी, २८/१२/२०१८ रोजी साय. ७ ते १० पर्यन्त सोलो नृत्य व होममिनिस्टर कार्यक्रम, २९/१२/२०१८ रोजी ग्रुप डांस, ३०/१२/२०१८ रोजी मुजरा महाराष्ट्राचा लावणी, ३१/१२/२०१८ रोजी सिंधुदुर्ग दशावतार वाट्यमण्डल पौराणिक दशावतार नाटक, १ जानेवारी रोजी बक्षीक वितरण समारम्भ व् जानेवारीरोजी ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

आपल्या शहरात ही यंदा महोत्सवाची धामधूम होणार म्हणून वांगणी येथील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

No comments