Header Ads

  • ताजा खबरें

    रेशनिंग ऑफिसला फेऱ्या मारून झाली जखम बुटाला सुद्धा पडले होल

     दिव्यांग महिलेने जनसेवा कार्यालयात मांडली आपली व्यथा 

    उल्हासनगर 4 लालचक्की परिसरातील नेत्रहीन रामदुलर यादव हा फाटलेली शिधापत्रिका जमा करून 2 महिन्या पासून नवीन शिप साठी चकरा मारत असताना याच कार्यालयात एक दिव्यांग महिला पिवळी शिधावाटप पत्रिका मिळवण्यासाठी 2 महिन्या पासून फेऱ्या मारत असून त्यामुळे तिच्या पायाला जखमा झाल्या असून सतत चालत येत असल्याने बूट देखील फाटला आहे
    आज सायंकाळी उल्हासनगर 4 येथील जनसेवा कार्यालयात तिने रुग्णमित्र भरत खरे याना आपल्या पायाची जखम दाखवून मदत मागितली
    खडगोलवली ,नित्यानंद कॉलनी येथील शम्मी सुरेंद्रसिंग चौरसिया ही महिला आपले दिव्यांग पती व लहान मुलां  समवेत राहत आहे
    ती लहान असताना तिचा डावा पाय अपघातात गमावला असल्याने तिने दिव्यांग सुरेंद्रसिंग सोबत विवाह केला तिला एक मुलगा असून तिने दोन महिन्या पूर्वी आपल्याला पिवळी शिधापत्रिका मिळणे कामी उल्हासनगर 5 येथील कार्यालयात  अर्ज सादर केला
    तिने सर्व प्रक्रिया पूर्ण करून आपल्या उत्पन्नाचे बाबत अफेडीव्हीट सुद्धा जमा केले पण निरीक्षक व शिधावाटप अधिकारी यांनी 15 हजार च्या आत वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणल्याशिवाय पिवळी शिधापत्रिका मिळणार नाही असे सांगून तिला कोणतीही मदत देण्याचे नाकारले
    याच कार्यालयात या पूर्वी अधिकारी शंकर होनमाणे हे दिव्यांग होते त्यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारच्या दिव्यांग यांच्यावर अन्याय होऊ दिला नाही
    त्यांच्या या कामगिरीमुळे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब ,आमदार डॉ बालाजी किणीकर साहेब ,रुग्णमित्र भरत खरे ,ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख जयकुमार केणी यांनी होनमाणे यांचा ट्रॉफी ,शाल ,पुष्पगुच्छ देऊन कार्यलयात जागतिक दिव्यांग दिनी सन्मान केला होता
    आणि हाच राग मनात धरून आता शिधावाटप निरीक्षक दिव्यांग यांचे हाल करत आहेत
    या बाबत लवकरच शिधावाटप कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असे रुग्णमित्र भरत खरे यांनी सांगितले

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad