Header Ads

  • ताजा खबरें

    रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या केंद्रीय कार्यालयाला शिक्षण मंत्री मा ना विनोदजी तावडे यांची सदिच्छा भेट

    आज दिनांक 22 डिसेंबर 2018 रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके शिक्षण मंत्री माननीय नामदार विनोदजी तावडे साहेब यांनी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या खारघर येथील केंद्रीय संपर्क कार्यालय तसेच तथागत महाविहार खारघर येथे सदिच्छा भेट दिली. तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबत शैक्षणिक चर्चा केली या प्रसंगी मा. ना. तावडे साहेब यांचे "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)", "रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद", "रामदास आठवले फाउंडेशन" आणि "तथागत महाविहराच्या" वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
    सदर प्रसंगी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर कांबळे, सरचिटणीस प्रा. सुशील महाडिक, सचिव सचिन बनसोडे, प्रशांत तोरणे, डॉ. जी. के. डोंगरगावकर, प्रा. रमेश करडे, प्रवीण मोरे, डॉ. विजय मोरे  संदीप चंदनशिव, संदीप घाटविसावे प्रियांका महाडिक,ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रा.नागसेन सूर्यवंशी, आदी मान्यवरांसह अनेक विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad