Header Ads

  • ताजा खबरें

    डीपी रोड, रस्ता रुंदीकरण कारवाई दोन दिवसात सुरु होणार ; महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश

    ठाणे(१) :शहरातील डीपी रोड अंमलबजावणी करणे तसेच रस्ता रुंदीकरणातंर्गत  बाधित बांधकामांवर दोन दिवसात कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज दिले.
    महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आज श्री.जयस्वाल यांनी यासंदर्भात आढावा घेवून विकास योजनेतंर्गत रस्ते आणि ज्या ठिकाणी रस्ते रूंदीकरणाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी दोन दिवसांत कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त(२)समीर उन्हाळे तसेच महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
     या बैठकीत श्री.जयस्वाल यांनी शहरातील सर्व रस्ते रुंद व मोकळे करण्यासाठी त्यामध्ये बाधीत सर्व बांधकामावर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले.या कारवाई अंतर्गत एम एम व्हॅली ते कल्याण रोड, कल्याण फाटा दत्त मंदिराच्या पाठीमागील रस्ता, तावशी रस्ता, दिवा आगासन जंक्शन ते दिवा स्टेशन,वाघबीळ रस्ता, नामदेववाडी टी.पी.स्कीम रस्ता, रस्ता क्र. ३३ वागळे इस्टेट कामगार हॉस्पिटल ‘रस्ता व रस्ता क्र.१६ या रस्त्यावरील एकूण ८०० रहिवास व 338 वाणिज्य बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad