Header Ads

  • ताजा खबरें

    चिखलोली धरणाची उंची वाढणार - आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची अंबरनाथकरांना नववर्ष भेट

    नगरोत्थान योजनेअंतर्गत ३१  कोटींच्या निधीला मंजूरी
    अंबरनाथ : अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाची उंची वाढविण्याकरीता निधी मंजूर करण्यात यावा यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर शासनाकडे करत असलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने नगरविकास विभागाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत ३१.१० कोटी रुपयांच्या निधीला मंगळवारी मंजुरी देण्यात आली.  चिखलोली धरणाची उंची वाढल्या नंतर अंबरनाथकरांना आपल्या हक्काचे अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.
    आ. डॉ. किणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचा मार्ग खुला झाला असून चिखलोली धरणाची उंची अडीच मीटरने वाढवण्यात येणार आहे. ही उंची वाढवल्याने चिखलोली धरणात अतिरिक्त ०.८० दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध होणार असून आ. डॉ. किणीकर यांच्यातर्फे अंबरनाथकरांना ही नव्या वर्षाची भेट ठरणार आहे. सध्या अंबनाथकरांना चिखलोली धरणाच्या माध्यमातून सहा दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होत असून या वाढीव जलसाठ्यामुळे नव्याने वाढलेल्या लोकसंख्येची तहान भागवणे शक्य होणार आहे.
    अंबरनाथ शहराकरिता लागू असलेल्या ७७ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचे काम अंतर्भूत होते परंतु, उंची वाढविण्याच्या कामाकरीता आवश्यक असलेले संकल्प चित्र सेंट्रल डिझाइन ऑरगॅनायझेशन, नाशिक यांच्याकडून विहित मुदतीत न मिळाल्याने या योजनमध्ये अंतर्भूत असलेल्या कामांच्या दरामध्ये वाढ झाल्याने आवश्यक निधी उपलब्ध व्हावा याकरिता आ. डॉ. किणीकर यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला.
     २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात देखील आमदार डॉ.किणीकर यांनी अंबरनाथ शहराकरिता लागू करण्यात आलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहात प्रश्न उपस्थित केला असता याला उत्तर देताना मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१६ पर्यंत योजना पूर्ण करण्याचे व चिखलोली धरणाच्या उंची वाढविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याअनुषंगाने फेब्रुवारी,२०१६ मध्ये नगरविकास राज्यमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ही घेण्यात आली होती. तसेच जलसंपदा राज्यमंत्री ना.विजय शिवतारे यांच्या दालनात ही संबंधित अधिकाऱ्यांसह बैठका घेण्यात आल्या होत्या. या पाठपुराव्याला पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब तसेच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे मौलिक सहकार्य आमदार डॉ. किणीकर यांना लाभले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad