Header Ads

  • ताजा खबरें

    अखेर मोक्काचा फरार आरोपी धनंजय उर्फ बॉडीमैन खंडु जाधव अंबरनाथ शिवाजी नगर पोलिसांच्या जाळ्यात सापडला

    मध्यरात्री अंबरनाथ आनंद नगर येथे चाकुने वार करुन चोरीच्या गुन्ह्याचा तपास
    अंबरनाथ शिवाजी नगर पोलिसांची उत्तम कामगिरी -स.पो.आयुक्त सुनिल पाटील
    अंबरनाथ (बदलापूर विकास मिडिया)- 23 डिसेंबर रोजी मध्यरात्री दरम्यान अंबरनाथ पूर्व आनंद नगर एमआयडीसी परिसरात तीन अज्ञात चोरट्यांनी झोपलेल्या दोन कामगारांवर चाकुने वार करुन मारहाण करुन त्यांच्याकडून मोबाईल फोन व पैसे हिसकावुन तेथुन पळ काढला. 
    संपुर्ण घटना सीसीटीव्ही कैमेरेत कैद झाली होती. शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आले व जखमींना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
    शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सदर गुन्ह्याचा अधिक तपास केले असता पोलिसांच्या लक्षात आले कि धनंजय उर्फ बॉडीमैन खंडु जाधव याने सदर गुन्हा केला आहे व सदर आरोपी विरोधात यापुर्वी देखील 10-15 गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे तसेच (संघटित गुन्हेगारी कायदा, 1999  महाराष्ट्र नियत्रण) मोक्का चा तो फरार आरोपी आहे. त्याअनुषंगाने व.पो.नि. गोसावी यांनी पोलिस निरीक्षक कोकाटे व इतर पोलिसांची टिम करुन धनंजय उर्फ बॉडीमैन खंडू जाधव याला अटक केले. आरोपीची चौकशी केली असता सदर गुन्ह्यात त्याला साथ देणार्या इतर दोन गुन्हेगारांची देखील माहिती मिळाली असता संजय रमेश जेस्वानी याला अटक करण्यात आले व अजुन एक आरोपी जयेश गोकुड सोनावणे धुलिया येथे पळुन गेल्याचे समजले.  
    शेवटी खबर्यांच्या सहकार्याने आरोपीचा शोध घेऊन जयेशला धुळे येथुन पकडण्यात पोलिस पथक यशस्वी ठरले. अटक आरोपींकडुन दोन चाकु व एक दुचाकी वाहन हस्तगत करण्यात आले असुन अंबरनाथ शिवाजी नगर पोलिसांची ही उत्तम कामगिरी असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पाटील यांनी बदलापूर विकास प्रतिनिधीजवळ दिली.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad