Header Ads

  • ताजा खबरें

    मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करुन कोकण विभाग पत्रकार संघाने नववर्षाचे केले स्वागत

    नववर्षाचे स्वागत म्हणुन कोकण विभाग पत्रकार संघाच्या वतीने दि. 31 डिसेंबर रोजी वारे येथील रायगड जिल्हा परिषद शाळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
    कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे, सरपंच रुपाली म्हस्के, गटशिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करुन मोफत आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. तब्बल 700 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. अनुभवी डॉक्टरांची टिम रुग्णांची तपासणी करण्यासाठी सज्ज होती. 
    स्त्री रोग, बाल रोग, हस्ती रोग, दंत चिकीत्सा, नेत्र चिकीत्सा या व अश्या अनेक आजारांची तपासणी करण्यात आली. मोफत आरोग्य तपासणी शिबिरासह शाळेतील विद्यार्थांना टुथपेस्टचे वाटप ही करण्यात आले.
    या आरोग्य शिबिरात मुरबाड अध्यक्ष जगन्नाथ गायकर, वारे मनसे अध्यक्ष लहु चौरे, अक्षय बोराडे, साहेर वसंत भाताडे, अश्विनी निवाते, अंध अपंग विकास संस्थेचे अध्यक्ष अरुण जोशी, जयवंत म्हसे, धनंजय म्हसे, मदन म्हसे व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच नेत्र तपासणी करणार्या 350 नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप देखील वाटप करण्यात आल्याची माहिती संजय हंडोरे यांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad