मुरबाड मुख्य बाजार पेठ मध्ये महिलांसाठी सुलभ शौचालय उभारणार
मनसेच्या पाठपुराव्याला यश ; महिलांचे मुलभुत प्रश्न मार्गी लागणार!
मुरबाड (बदलापूर विकास मिडिया)- मुरबाड शहरातील मुख्य बाजार पेठ दरम्यान महिलांसाठी एकही सुलभ शौचालयाची व्यवस्था नव्हती. महिलांच्या या मुलभुत समस्येकडे लक्ष देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड शहरच्या वतीने मुरबाड नगरपंचायतीकडे अनेकदा मागणी व पाठपुरावा करण्यात आला. शेवटी काल मुरबाड नगरपंचायत मुख्य बाजारपेठ लगत खरेदी विक्री भवनच्या बाजुला सुलभ शौचालय लवकरच उभारणार असल्याची अधिकृत्त घोषणा करण्यात आली व भुमीपुजन कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी मुरबाड नगरपंचायतीचे राजकिय नेते व अधिकारी वर्ग, मुख्याधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या या समस्येबाबत शेवटपर्यंत पाठपुरावा करुन मागणी केल्यामुळेट आता मुरबाड मुख्य बाजार पेठ येथे महिलांसाठी सुलभ शौचालय उभारले जाणार असुन त्याचे श्रेय मनसे शहराध्यक्ष नरेश देसले व कार्यकर्त्यांना जाते असे परिसरातील महिलांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले.
No comments