बदलापुर एमआयडीसी येथील प्लॅटिनम पॉलीमर केमिकल कंपनीत अग्नि तांडव
बदलापूर (बदलापुर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर नगरपरिषद हद्दीतील बदलापूर माणकिवली एमआयडीसी मधील एका कंपनीत आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे. प्लैटिनम पॉलीमर केमिकल असे या कंपनीचे नाव असुन त्या कंपनीत ज्वलनशिल केमिकलच्या ड्रमचा स्फोट होवून आगिचा भडका उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी बदलापूर विकासला सांगितले.
आग आटोक्यात आणण्याचे काम बदलापूर अग्निशमन दल प्रयत्न करत असुन आगीने विद्र रुप धारण केले आहे. आगीचा भडवा इतका मोठा होता कि आजुबाजुच्या कंपनीला सुद्धा आग पसरत होते. स्फोट होताच कंपनीतील कामगारांनी आपला जीव वाचवुन बाहेर पळाल्यामुळे मोठी जिवीतहानी टळली.


प्लैटिनम पॉलीमर केमिकल कंपनीला लागल्या आगीमुळे पुन्हा एकदा बदलापूर एमआयडीसी मधील कंपन्यांच्या सुरक्षा आणि सेफ्टी फिचर्सचा प्रश्न उपस्थित होत आहे.
No comments