`बहर' स्त्रियांसाठी कार्यशाळा
ठाणे (बदलापूर विकास मिडिया) दि. 4 - आय.पी.एच. ठाणे ही संस्था गेली 10 वर्षे खास स्त्रियांसाठी बहर या कार्यशाळेचे आयोजन करत आहे. ही एक व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा असून, 18 वर्षांपुढील सर्व महिलांकरिता खुली आहे. या वर्षी ही कार्यशाळा शनिवार, 19 जानेवारी व शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 असे दोन दिवस सकाळी 10 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत `स्व'चा शोध, `स्व'चा विकास, संवाद कौशल्ये, आग्रहीपणा व ताणतणावांचे नियोजन हे विषय हाताळले जातील. अधिक माहिती व नोंदणीसाठी 9870115693 या क्रमांकावर संपर्प साधावा.
No comments