Header Ads

  • ताजा खबरें

    विंटेज एडव्हर्टायझिंगच्या अनधिकृत्त होर्डिंगवर कारवाई करण्याची बदलापूर विकासची मागणी

    उल्हासनगर (बदलापूर विकास मिडिया)- उल्हासनगर महापालिके अंतगर्त तसेच कल्याण डोंबवली महापालिके अंतगर्त अनधिकृत्त होर्डिंग लाऊन शहर विद्रुपीकरण करण्याचे काम उल्हासनगर टिलसल शॉपिंग सेंटर याठिकाणाहुन कार्यरत असलेले विंटेज एडव्हर्टायझिंग कंपनी करत असल्याची माहिती सुत्रांकडून समजते.
    काही वर्षांपुर्वी उल्हासनगर शहरात अनधिकृत्त होर्डिंग लाऊन जाहिरातीचा व्यवसाय करणारे "लक्ष्मी एडव्हर्टायझिंग"चेच नाव बदलुन आता "विंटेज एडव्हर्टायझिंग" या नावाने पुन्हा एकदा उल्हासनगर व कल्याण शहरात अनधिकृत्त होर्डिंग द्वारा शहर विद्रुपीकरण करण्याचे सत्र सुरु आहे. 
    विंटेज एडव्हर्टायझिंग या कंपनीच्या विरोधात उल्हासनगर महापालिकेच्या अनेक नगरसेवकांनी विरोध केला परंतु उ.म.पा.च्या एका नगरसेवकाचाच विंटेज एडव्हर्टायझिंग कंपनीला छुपा पाठिंबा व आर्थिक साठेलोटे असल्याने अद्याप अनधिकृत्त होर्डिंगवर कारवाई होतांना दिसत नाही.
    दै. बदलापूर विकास मिडियाने उमपा आयुक्त यांच्याकडे सदर विंटेज एडव्हर्टायझिंगच्या अनधिकृत्त होर्डिंगवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे तसेच हाईकोर्टाच्या आदेशाप्रमाणे उल्हासनगर पोलिस उपायुक्त यांनी देखील संबंधीत एडव्हर्टायझिंग कंपनी विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणुन तक्रार अर्ज दिले असल्याचे समजते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad