
बदलापूरः-(बदलापूर विकास मिडिया)- शनिवार 5 जानेवारी, 2019 रोजी बदलापूर (पश्चिम), बॅरेज रोड, समर्थ नगर येथील सागर गंगा व महेंद्रगिरी जवळ असलेल्य सर्वमनोकामनापूर्ती श्री शनिमंदिरात धुमधडाक्यात साजरी केली जाईल.शनिवारी पहाटे 4 वाजून 58 मिनिटाने शइन अमावास्या सुरु होणार व 6 तारखेच्य पहाटे 6 वाजून 58 मिनिटांपर्यत धनु राशीत अमावास्या आहे.या शनि अमावास्येला शेकडो भाविक मंदिरात दर्शनाला येणार. या मंदिरात शनिदेवाची मूर्ती नसून शनिदेवाची शिला आहे व शनिदेवाच्या शिलेजवळ मारुतीची मूर्ती प्रस्थापित केली आहे. मंदिर खुले असून चौथर्यावर शिला व मारुती ची मूर्ती तिर्थक्षेत्र श्री शनि शिंगणापूर सारखेच बनविण्यात आले आहे.शनिमंदिराच्या जवळच्या शेड मध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री शिवलिंग तसेच गणपतीच्या मूर्तीची प्राण प्रतिस्थापना करण्यात आली आहे.या मंदिरातील शनिदेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शिरगाव आपटेवाडीचे पंडित वाटवे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली आहे.इतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आचार्य पंडित कृपाशंकर पांडे यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
या शनिमंदिराचे निर्माण माजी नगरसेवक व भाजपा पदाधिकारी जयवंत मुठे व वरिष्ठ पत्रकार डॉ.जगन्नाथ कामत यांनी केले आहे.मंदिर निर्माणच्या वेळेस नगरसेवक श्री सुरज मुठे, नयन मुठे, नरहरी(नरु सेठ) पाटील, बॉण्डरायडर रवि जाधव, मंगेस धुळे, अविनाश पातकर, शरद तेली, राजन चव्हाण, अविनाश भोपी, प्रशांत (अण्णा) कुलकर्णी यांनी यथाशक्ती सहकार्य केले. 15 मे 2018 ला या मंदिरात श्री शनैश्वर जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली होती व रात्री भंडाराचे आयोजन करण्यात आले होते. 11 ऑगस्ट 2018 ला शनि अमावास्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या निमित्ताने शनिमंदिरा तर्फे भंडाराचे (अन्नदान) आयोजन करण्यात आले होते.शनिवार 22 डिसेंबर रोजी मंदिरात श्री दत्तजयंती उत्सवाचे आयोजन मनसेचे संजय पुजारी व सोनिया पुजारी (मामा-मामी) यांनी केले होते. वेळोवेळी मंदिराचे डेकोरेशन साज सजावट करण्यासाठी संजय पुजारी, सोनिया पुजारी व त्यांचे कार्यकर्ते मेहनत घेतात व मंदिर व्यवस्थापनाला सहकार्य करतात. शनि मंदिराची जमिन माजी नगरसेवक जयवंत मुठे यांनी मोफत दान म्हणून दिलेली आहे. मंदिरातील पूजा विधीचे कार्य पुजारी मनोहर पांडे करतात. मंदिर मधील फूल, हार, वीज, पाणी, स्वच्छता, तेल, दिवाबत्ती ची सर्व पूजा साहित्याची व्यवस्था वरिष्ठ पत्रकार डॉ.जगन्नाथ कामत करतात. मंदिरात येणार्या शनिभक्तांच्या मनोकामना शनिदेव पूर्ण करतात व ज्यांच्या मनोकामना पूर्ण होतात ते स्वेच्छेने मंदिरात घंटी. त्रिशूल, जलकलश, पूजेचे भांडे मंदिरात आणून देतात. मंदिरात सर्व जाति धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे.
मंदिरासाठी कोणतीही देणगी, वर्गणी, चंदा मागितला जात नाही.मंदिरात ज्यांची इच्छा असेल, ते दानपेटीत मदत टाकतात.वाचकहो, 5 जानेवारीला शनि अमावास्या आहे. बघा, जमले तर एकदा या मंदिराला अवश्य भेट द्या व शनिदेवाचे आशिर्वाद घ्या.
No comments