उल्हासनगरात फ्लैत घेण्यापुर्वी ग्राहकांनी इमारतीच्या अधिकृत्तेची पुर्ण चौकशी करावी -नियोजन सभापती सौ. मिना सोंडे यांचे आवाहन
उल्हासनगर (बदलापुर विकास मिडिया)- उल्हासनगर शहरात 855 अनधिकृत्त इमारतीचा मुद्दा अजुनही संपुष्ट आलेले नसतांना शहरात विविध ठिकाणी दररोज अनधिकृत्त बांधकाम सुरु असुन उल्हासनगर शहरात फ्लैट विकत घेतांना ग्राहकांना इमारतीच्या कागदपत्रांची पुर्ण चौकशी करुन त्यानंतरच आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवावा असे उल्हासनगर महापालिकेच्या नियोजन सभापती सौ. मिनाताई तोंडे यांनी आवाहन केले.
सध्या उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी छोट्यांपासुन ते नावाजलेले बिल्डर अनधिकृत्त इमारतींचे बांधकाम करत आहेत व आकर्षक जाहिराती दाखवुन ग्राहकांच्या तो फ्लैट माथी मारले जात आहे. उमपा क्षेत्रात ज्याठिकाणी नियोजीत रस्ता होणार आहे अश्या ठिकाणी सुद्धा इमारतींचे बांधकाम करण्यात आल्याने विविध प्रकरण आता कोर्टात जाणार असुन ग्राहकांनी स्वप्नाचे घर घेतांना भरपूर विचार करावा. नगररचनाकार यांनी उल्हासनगर शहरातील अनेक बांधकामांची चौकशी करुन अनधिकृत्त इमारतींच्या बांधकामावर रिमार्क दिल्यानंतर सुद्धा काम ठांबविण्याऐवजी तसेच परवानगी न मिळाल्यानंतर सुद्धा टुमदार इमारतींचे बांधकाम दिवसाढवळ्या चालु आहे. विशेष म्हणजे उमपा ची परवानगी असल्याचा बोर्ड देखील काही भुमाफिया त्यांच्या अनधिकृत्त बांधकामाच्या साईटवर लाऊन ग्राहकांची व अधिकार्यांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत आहेत. नियोजन सभापती म्हणुन माझ्याकडे अनेक तक्रारी आले असुन त्या अनधिकृत्त इमारतींवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी लेखी तक्रार नगररचनाकार यांना देणार असल्याचेही सौ. मीना सोंडे यांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले.
No comments