डंपरला ओवरटेक करण्याच्या नादात झाला अपघात ; एक ठार एक जखमी
डिव्हायडरला दिली धडक
उल्हासनगर (बदलापुर विकास मिडिया)- थर्टीफस्टच्या दिवशी उल्हासनगर 3 अशोक अनिल टॉकीस येथील रस्त्यावर सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास दोन इसम मेस्ट्रो दुचाकी वरून जात असतांना डिव्हायडरला धडक दिल्याने अपघात झाला. त्यामध्ये एका इसमाचे जागीच मृत्यु झाल्याचे समजते.
डंपरला ओवरटेक करण्याचा प्रयत्न करतांना समोरील डिव्हायडरला धडक देऊन डंपर खाली सापडल्याने दुचाकीवर स्वार डंपर खाली सापडुन एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी. पोलिसांना सुचना मिळाल्यानंतर घटनेचा पंचनामा करुन मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले.
No comments