रुग्णमित्र भरत खरे यांनी तानाजी नगर उल्हासनगर 1 येथील दिव्यांग बांधव च्या समस्या घेतल्या जाणून
उल्हासनगर (बदलापुर विकास मिडिया)- काल उल्हासनगर 1 बिर्ला गेट शेजारी तानाजी नगर येथील दिव्यांग बांधव यांच्या प्रत्येक्ष घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. एका निराधार दिव्यांग ला संजय गांधी राधार योजनेचे अनुदान नोट बंदी च्या काळात बंद झाले तर त्याच्या कडे सक्षम अधिकारी चा दिव्यांग दाखला असताना ऑन लाईन दाखल्याच्या नावाखाली महापालिकेने अनुदान नाकारल्याने त्याची उपासमार होत आहे.
दुसरीकडे रेशनकार्ड धारक याना कमी राशन मिळत आहे घरात गॅस नसताना सुद्धा कार्डावर गॅस चा शिक्का मारून त्याचे थोडेफार मिळणारे रॉकेल देखील बंद करण्यात आले आहे. काही दिव्यांग यांच्या कडे शिधापत्रिका नसल्याचे आढळले त्यांना स्थानिक नगरसेवक दिलीप गायकवाड यांना फोन करून खरे यांनी त्यांना शिफारस पत्र देण्याची विनंती केली. त्यांना सुद्धा शिधापत्रिका मिळवून शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले
No comments