कुणबी समाज सेवा संघाचे दिनदर्शिका आमदार कथोरेंच्या हस्ते लोकार्पण
बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- बदलापूर शहरात आगरी हे समाज आपल्याला अनेकदा ऐकायला येते त्याचप्रमाणे कुणबी समाजातील नागरिक देखील बदलापूर तसेच मुरबाड मध्ये मोठ्या संख्येत आहेत. त्या नागरिकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी तसेच त्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने बदलापूर व मुरबाडच्या कुणबी समाजातील बांधवांसाठी कुणबी समाज सेवा संघ संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे काल दिनदर्शिका लोकप्रिय आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
त्यावेळी आमदार कथोरेंसोबत माजी नगरसेवक रमेश सोळसे, भाजपा पदाधिकारी श्रीकांत भोईर, उद्योजक व समाजसेवक कृष्णा शिंधे व इतर मान्यवर तसेच कुणबी समाज सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments