64 व्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत घवघवीत यश मिळवणार्या खेलाडुंचे शिवसेना गटनेत्यांनी केला सत्कार
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नुकताच 64 व्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 19 वर्षा खालील गटात सिद्धेश कमलाकर गोरे आणि सहकार्यांचा संघाने दुसरा क्रमांक पटकावला. राष्ट्रीय पातळीवर बदलापूर शहराच्या सिध्देश कमलाकर गोरे तसेच सहकार्यानीं घवघवीत यश मिळवल्याबद्दल शिवसेना गटनेता व कु.ब.न.प. चे नगरसेवक श्रीधर पाटील यांनी सिद्धेश व टिमला अभिनंदन केले. सिद्धेशच्या घरे सदिच्छा भेट देऊन त्याला पुष्पगुच्छ देऊन नगरसेवक पाटील यांनी त्याचा सत्कार केला तसेच भविष्यात अश्याचप्रकारे मेहनत घेऊन आपले व बदलापूर शहराचे नावलौकिक करावे असे सांगुन शुभेच्छा दिल्या.नगरसेवक श्रीधर पाटील यांच्यासोबत समाजसेवक विक्रांत कांबळे व इतर शिवसैनिकांनी सुद्धा सिद्धेशवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
सिद्धेश व त्याच्या टिमच्या अथक प्रयत्नांमुळे तसेच जिंकण्याच्या जिद्द मुळेच राष्ट्रीय पातळीवर रग्बी स्पर्धेत बदलापूर शहराचे नाव झाल्याचे नगरसेवक श्रीधर पाटील यांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले.
No comments