Header Ads

  • ताजा खबरें

    टायगर ग्रुप उल्हासनगर शहराध्यक्ष मा. ईर्शाद शेख यांच्या वाढदिवसाची जैय्यत तैय्यारी

    टायगर ग्रुपचे कार्यकर्ते "सामाजिक उपक्रम" राबवुन साजरा करणार वाढदिवस!
    ulhasnagar tiger group irshad shaikh birthday news on badlapur vikas newspaper उल्हासनगर (बदलापूर विकास मिडिया)- उल्हासनगर शहरातील सामान्य जनांचा बुलंद आवाज म्हणुन ओळखले जाणारे तसेच तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले टायगर ग्रुप उल्हासनगर शहराध्यक्ष यांचा 5 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईर्शाद शेख यांचे समर्थक विविध सामाजिक उपक्रम राबवुन वाढदिवस साजरा करणार आहेत.
    उल्हासनगर 3 चोपडा कोर्टजवळील   परिसर येथील ढाणा वाढ तसेच उल्हासनगर टायगर ग्रुप मा. श्री. ईर्शाद शेख यांचा वाढदिवस 5 जानेवारी रोजी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्याचे टायगर ग्रुपच्या सदस्यांनी तसेच उल्हासनगर शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी ठरविले असुन शहरातील रुग्णालयात तसेच वृद्धाश्रमात फळे वाटप करुन त्याचसोबत उल्हासनगर तालुक्यातील ग्रामिण परिसरातील आदिवासी पाड्यांना भेट देऊन तेथे केक कापून ईर्शाद शेख आपला वाढदिवस साजरा करणार आहेत.

    ulhasnagar tiger group irshad shaikh news on badlapur vikas newspaper उल्हासनगर शहराध्यक्ष ईर्शाद शेख यांचे कट्टर समर्थन बबलु कोरी व टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मिळुन मा. श्री. ईर्शाद शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणुन "टायगर ग्रुप उल्हासनगर सोशल मिडियाचे नविन उपक्रम" देखील राबवणार आहे. ज्यामध्ये उल्हासनगर शहर व ग्रामिण क्षेत्रातील गोर गरिबांना सहकार्य करणे, शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, तरुणांना मार्गदर्शन करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवुन देणे, महिलांना स्वावलंबी होण्यासाठी शासनातर्फे विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहचिणे, ज्येष्ठ नागरिकांना पॅन कार्ड व आधार कार्ड साठी विविध कॅम्प मध्ये रांग न लावता त्यांच्यासाठी टायगर ग्रुपच्या टीमची स्थापना करुन त्यांना ते काम सोयीस्कर करुन देणे, टायगर ग्रुप उल्हासनगर तर्फे होणार्या प्रत्येक सामाजिक कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी सोशल मिडियाद्वारे, समक्ष भेटून तसेच संकेतस्थळावर नागरिकांशी संपर्क साधणे, ज्या गोर गरिबांवर अन्याय झाला आहे अश्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रशासनाकडे तसेच न्यायालयात पाठपुरावा करणे त्याचसोबत मोफत कायदे विषयक सल्लागार अनुभवी वकिलांमार्फत देणे अश्या विविध सामाजिक उपक्रम टायगर ग्रुप उल्हासनगरचे शहराध्यक्ष ईर्शाद शेख यांच्या वाढदिवसापासुन सुरु होणार असल्याचे कोरे यांनी जाहिर केले. त्याच सुरुवात म्हणुन वाढदिवसाची जय्यत तैय्यारी आतापासुनच उल्हासनगर टायगर ग्रुपचे सर्व कार्यकर्ते करत असल्याचे समजते..
    bablu kori social media tiger group ulhasnagar irshad shaikh president"टायगर ग्रुप या संघटनेच्या माध्यमातुन आमचे लाडके बंधु ईर्शाद शेख यांनी दरवेळी उल्हासनगर शहरातील तरुणांसोबत थाम पणे उभे राहिले. जात, धर्म, पक्ष भेद यागोष्टी न जुमानता, भेदभाव न करता उल्हासनगर शहरातील प्रत्येक तरुणाच्या विकासाच्या दृष्टीने ईर्शाद शेख यांनी निःस्वार्थ भावनेने काम केले आहे त्याची सर्व टायगर ग्रुप कार्यकर्त्यांना जाणीव आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सामाजिक उपक्रम राबवुन त्यांचा वाढदिवस अविस्मरणीय करणार आहोत" असे शेवटी टायगर ग्रुप उल्हासनगर शहर सोशल मिडिया सेल चे बबलु कोरी यांनी बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad