राजधानीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
नवी दिल्ली , 03 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.
कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त(अ.का.)समीर सहाय यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, राजीव मलिक, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

No comments