‘लोकसंवाद’मधून ठाणे जिल्ह्यातील आवास योजनेचे लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी
ठाणे दि १: शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोकसंवाद’ साधून जाणून घेणार आहेत. उद्या बुधवार २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणारा संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही लाईव्ह पाहता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध आवास योजनांचे लाभार्थी देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी होतील.
हा लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या devendra.fadnavis या फेसबुक पेजवर, Dev_Fadnavis या ट्विटर हॅण्डलवर आणि Devendra.Fadnavis या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेज आणि youtube.com/maharashtradgipr यू ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.
No comments