Header Ads

  • ताजा खबरें

    सिडकोची ऑनलाइन शुल्क भरणा व्यवस्था आता COPAS वेबपेजवर उपलब्ध

     सिडको महामंडळ उपलब्ध असलेल्या आधुनिक व सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या नियोजन आणि विकासासंबंधी उपक्रमांचे अद्ययावतीकरण करण्याकरिता नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. नवी मुंबईतील नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळावी म्हणून महामंडळाने दैनंदिन कामकाजांशी संबंधित प्रक्रिया अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून सिडकोने 2010 पासून देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्यांबाबतचा तपशील आपल्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर ‘एक खिडकी व्यवस्था’ आणि ‘व्यवसाय सुलभता’ या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. CIDCO Online Plan Approval System (COPAS) अंतर्गत या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
    याचाच पुढील भाग म्हणून सिडकोने आपल्या विविध प्रकल्पांकरिता शुल्क भरणा प्रक्रिया सहजसोपी व्हावी म्हणून उचललेले पाऊल. ते म्हणजे COPAS आणि ऑनलाइन शुल्क भरणा पोर्टल यांचे केलेले एकत्रिकरण. या पोर्टलमुळे यापूर्वी किचकट वाटणारी शुल्क भरणा प्रक्रिया आता सहजसोपी  होऊन नागरिकांचा वा व्यावसायिकांचा त्यासाठीचा वेळही वाचणार आहे. COPAS वरील ऑनलाइन शुल्क भरणा पोर्टलच्या साहाय्याने नागरिक/व्यावसायिक अगदी कमी वेळात शुल्क भरणा करू शकतील. शुल्क भरणा क्रेडिट कार्ड/डेबीट कार्ड, इंटरनेट बॅंकिग तसेच आरटीजीएस-एनइएफटी अशा विविध माध्यमांद्वारे करता येईल. 
    ऑनाइन शुल्क भरणा सुविधा पुढील दुव्यावर (लिंक) उपलब्ध आहे :

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad