लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना
ठाणे (बदलापुर विकास मिडिया)दि १:- राज्य शासनाने यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे, चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतूने जिल्हास्तरावर उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना आयोजित केली आहे. या योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातील उद्योजकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वृषाली सोने यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत पहिल्या दोन पुरस्कार विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार रुपये आणि दहा हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. अर्जदार जानेवारी २०१५ रोजी किंवा त्यापूर्वीचा स्थायी लघुउद्योग नोंदणीकृत, पार्ट-२ ज्ञापन स्वीकृतिधारक असावा. अर्जदार मागील दोन वर्षे सलग उत्पादनात असावा. अर्जदार कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अर्जदार यापूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा. निर्याताभिमुख घटक, महिला उद्योजक, मागासवर्गीय उद्योजक यांना प्राधान्य दिले जाईल. विहित नमुन्यातील अर्ज उद्योग विभागाच्या www.di.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर असून जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे येथे उपलब्ध आहे.
No comments