Header Ads

  • ताजा खबरें

    युथ ऑफ टुडे फाऊंडेशन व समाजसेवक समिर देशमुख यांचा थर्टीफस्ट निमित्त स्तुत्य उपक्रम

    बदलापुर (बदलापूर विकास मिडिया)- 31 डिसेंबर म्हणजेच थर्टीफस्टच्या दिवशी मौज, मचा, डान्स, क्लबिंग व नाईट डीजे पार्टी या गोष्टींकडे आजच्या तरुण पिढीचा कल असला तरी बदलापुरातील काही तरुणांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने थर्टीफस्ट साजरा करुन ते त्यांच्याच नाही तर अनेक बेघर, गोरगरिब व गरजवंतांच्या स्मरणात राहिल असे उपक्रम करण्यात आले.

    समाजसेवक समिर देशमुख व युथ ऑफ टूडे फाऊंडेशनच्या वतीने थर्टीफस्ट निमित्त बदलापुर व आसपासच्या खेडे पाड्यातील बेघर व आदिवासी पाड्यातील लहान मुले, वयोवृद्ध व चिमुकल्यांना नववर्षाच्या स्वागतार्थ बदलापुर पुर्व कात्रप येथील डोमिनॉस मध्ये पिझा ट्रीट देऊन त्यांनी खर्या अर्थाने मनुष्य सेवा हीच इश्वर सेवा असल्याचे दाखवुन दिले. 
    पिझा खातांना अनेकांच्या डोळ्यातील अश्रु अनावर झाले, सर्वांनी समाजसेवक देशमुख व संस्थेच्या पदाधिकार्यांचे आभार मानले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad