Header Ads

  • ताजा खबरें

    रोट्रक्ट क्लब ऑफ बदलापूर आयोजित "एक्पोशर" छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन

    बदलापुरः- छायाचित्र काढणार्यांसाठी तसेच विविध विषयांवरील छायाचित्र पाहणार्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे रोट्रक्ट क्लब ऑफ बदलापूर च्या वतीने "एक्पोशर छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शन" चे आयोजन दि. 6 जानेवारी रोजी बदलापुरात करण्यात येणार आहे.
    संपुर्ण महाराष्ट्र राज्यातुन शेकडो छायाचित्रकारांनी विविष विषयांवर, जनजागृती करणारे तसेच लोकांचे लक्ष वेधुन घेणारे असे अनेक क्षण आपल्या कैमरेत टिपलेले असुन ते सर्व छायाचित्र "एक्पोशर" छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनात नागरिकांना पहायला मिळणार आहे.
    बदलापूर पूर्व गांधी चौक येथील काटदरे मंगल कार्यालय याठिकाणी "एक्पोशर" छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन विजेत्यांना तब्बल 70,000 रुपयांचे रोख रक्कम बक्षिस म्हणुन देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी छायाचित्रकारांना कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही, ज्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातुन शेकडो स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. तसेच छायाचित्र प्रदर्शनात नागरिकांना देखील प्रवेश मोफत आहे. तरी नागरिकांनी व नवोदित छायाचित्रकारांनी प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावे असे रोट्रक्ट क्लब ऑफ बदलापुरटे विराज घैसास व वेदांत थत्ते यांनी बदलापुर विकास मार्फत आवाहन केले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad