क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ठाणे दि ३ : स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रणेत्या व महिला शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी यांनी देखील त्यांच्या कार्याला उजाळा देत सावित्रीबाई फुले यांना नमन केले.
No comments