चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा साक्षरता अभियान चित्ररथाचे उद्घाटन
ठाणे जिल्ह्यामध्ये संभाव्य चारा टंचाई स्थिती लक्षात घेता पशुसंवर्धन विभागामार्फत चारासाक्षरता अभियान राबविण्यात येत असून त्याचा चित्ररथ भिवंडी,शहापूर, मुरबाड,अंबरनाथ व कल्याण तालुक्यातील गावामध्ये फिरविण्यात येणार आहे
या अभियानामध्ये पशूपालक व दुग्धउत्पादक शेतकर्यांना स्थानिक पातळीवर त्यांच्याकडे उपलब्ध असलेला हिरवा व वाळलेला चार्याचे योग्य नियोजन, आधुनिक व्यवस्थापन, साठवणूक पध्दती, चार्याची बचत, व्यवस्थापन , चार्यापासून मुरघास तयार करणे व टिकविणे, चार्याची सकसता व पाचकता वाढविणे तसेच अझोला व हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे हिरवा चारा उत्पादन करणे बाबत माहिती व प्रात्यक्षिके तज्ञाकडून देण्यात येणार आहे.
याचा लाभ पशुपालकानी व दुग्धउत्पादक शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ.विनोद राईकवार , जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ.लक्ष्मण पवार यांनी केले. सदरील उद्घाटन कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील पशुसवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त पशुसवर्धन डा.उमेशवैद्य,डा.विवेक पाटील, डा.अशोक सिंग तसेच पशुधन विकास अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक कर्मचारी हजर होते.
No comments