ठाण्यात ‘’महापौर चषक पॉवर लिफ्टिंग’ स्पर्धेचे आयोजन
ठाणे (2): ठाणे महानगरपालिका व अॅमेच्यूअर पॉवर लिफ्टिंग वेलफेअर असोसिएशन यांचे संयुक्त ठाणे महापौर चषक पॉवर लिफ्टिंग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ४ जानेवारी, २०१९ रोजी सकाळी ९.00 वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महापौर सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. वागळे इस्टेट येथील ठामपा शाळा क्र.२४ किसननगर नं.३ येथे या स्पर्धा होणार असून हे सामने पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी खासदार सर्वश्री राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, कुमार केतकर, आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, डॉ.जितेंद्र आव्हाड,संजय केळकर, सुभाष भोईर, अँड. निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश मस्के,विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील,महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती दिपक वेतकर, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, वागळे प्रभाग समिती अध्यक्षा कांचन चिंदरकर, अँमेच्यूअर पॉवर लिफ्टिंग वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी सूर्यराव, सचिव सुरेश चेडे आदी उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धा पुरुष व महिला या दोन विभागात होणार आहेत.यामध्ये पुरुष विभागात ५९ किलो,६६ किलो, ७४किलो,८३ किलो,९३किलो, १०५ किलो व १२० किलो तर महिला विभागात ४७ किलो, ५२ किलो, ५७किलो, ६३किलो, ७४किलो, ८४किलो व ८४ किलोवरील या गटात ही स्पर्धा होणार असून स्पर्धेसाठी एकूण २ लाख 70 हजार रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी हे सामने पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments