रस्ता ररूंदीकरण कारवाईतंर्गत 114 व्यावसायिक बांधकामे निष्काषित
23 गॅरजेसवर बुलडोझर - महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई
उद्या वागळे इस्टेटमधील 16, 22, 33 या रस्त्यांवर होणार कारवाई
दरम्यान रस्ता रूंदीकरण मोहिमेबरोबरच आज घोडबंदर रोज सेवा रस्त्यावरील जवळपास 23 गॅरेजेस तोडून टाकण्यात आली. सदरची कारवाई उद्याही सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असून कारवाईच्या दुस-या दिवशी वागळे इस्टेट रोड नं. 16, 22 आणि 33 या रस्त्यांच्या रूंदीकरणाची कारवाई हाती घेण्यात येणार आहे.
आज सकाळपासून कडक पोलिस बंदोबस्तात वाघबीळ जंक्शन ते वाघबीळ गाव या दरम्यान रस्ता रूंदीकरण कारवाईला सुरूवात करण्यात आली. या कारवाई अंतर्गत जवळपास वाघबीळ नाका ते वाघबीळ गाव या रस्त्यावरील जवळपास 114 व्यावसायिक बांधकामे निष्काषित करण्यात आली.
दरम्यान आज घोडबंदर रोडवरील गॅरेजेसवरही जोरदार कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये जवळपास 23 गॅरेजेस तोडून टाकण्यात आले.
सदरची कारवाई उपायुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले, संदीप माळवी, नगर अभियंता राजन खांडपेकर, उपनगर अभियंता रविंद्र खडताळे, अर्जून अहिरे, सहाय्यक आयुक्त चारूशीला पंडीत, मारूती गायकवाड, शंकर पाटोळे, अनुराधा बाबर, झुंजार परदेशी कार्यकारी अभियंता नितीन पवार, नितीन येसुगडे, दिपक घाडगे, रामदास शिंदे, चेतन पटेल यांनी पोलिस बंदोबस्तात केली.
No comments