Header Ads

  • ताजा खबरें

    मिरा भाईंदरमध्ये ईव्हीएम मशीनबाबत जनजागृती

    ठाणे दि ४: ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबत जागृती व्हावी तसेच या मशीन नागरिकाना हाताळता याव्यात, यासाठी 145 मिरा भाईंदर विधानसभा मतदार संघात 13 फेब्रुवारीपर्यंत वेगवेगळ्या ‍ठिकाणी प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत असे सतिश बागल, प्र. मतदार नोंदणी अधिकारी, मुकेश पाटील, तहसिलदार (रेतीगट) यांनी माहिती देतांना सांगितले.
     145 मिरा भाईंदर विधानसभा मतदार संघात 4,00,914 एवढया मतदारांच्या नोंदी आहेत. सदर उपक्रम मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मुख्य चौक, नाके, मिरा भाईंदर महानगरपालिका शाळा, विदयालये, सार्वजनिक  ठिकाणे, सहकारी गृहनिर्माण संस्था इ. महत्त्वाच्या  ठिकाणी  मोबाईल व्हॅनद्वारे राबविण्यात येणार आहे.
     तसेच याद्वारे नागरिकांना आव्हान करण्यात येते की, प्रत्येक मतदाराने आपले नाव व फोटो मतदार यादीत आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. आपला फोटो नसल्यास आपला अलीकडच्या काळातील रंगीत फोटो आपले मतदान केद्रस्तरीय अधि कारी(BLO) अथवा 145 मिरा भाईंदर विधानसभा मतदार संघाचे कार्यालय (पत्ता- पहिला मजला, प्रभाग समिती कार्यालय क्र. 06, मिरा भाईंदर महानगर पालिका,राष्ट्रसंत आचार्य श्री पद्मसागर सुरीश्वरजी भवन, शांती गार्डन सेक्टर 5, मिरारोड (पू.) ) येथे जमा करण्यात यावीत.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad