नवी मुंबईचे पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत सानपाडा कॉलेजचे स्नेहसंमेलन
ठाणे दि ४: ओरिएन्टल एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स एंड टेक्नोलॉजीचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम” ओरिएन्स २०१८ नुकताच सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे पार पडला. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार तसेच माजी शिक्षण मंत्री जावेद खान यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्राचार्य रावसाहेब यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध जून कौशल्य दाखविणारे कार्यक्रम सदर केले. विशेषत: नृत्याच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घाटकोपरच्या विद्या भवन महाविद्यालयाच्या मीनल भोले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
महाविद्यालयाचे वार्षिक मासिक “ फिनिक्स” चे प्रकाशन यावेळी करण्यात आले. संजय कुमार यांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षकांनाही गौरविण्यात आले.
No comments