Header Ads

  • ताजा खबरें

    श्री साई एकविरा पदयात्री मित्र मंडळ आयोजित भव्य पालखी व पदयात्रा सोहळा उत्साहात सम्पन्न

    sathya-sai-ekvira-pyaayatri-mitra-mandal-organized-the-grand-palkhi-and-padyatra-celebrations उल्हासनगर (बदलापूर विकास मिडिया)- उल्हासनगर शहर 3 विठ्ठल मंदिर ब्राम्हणपाडा शिव कॉलनी येथील साई भक्तांनी श्री साई एकविरा पदयात्री मित्र मंडळाच्या नेतृत्वाखाली दि. 23 डिसेंबर ते 2 जानेवारी ब्राम्हणपाडा (उल्हासनगर) ते श्री क्षेत्र शिर्डी भव्य पालखी व पदयात्रेचे आयोजन केले होते. या पदयात्रेत उल्हासनगरचे सुप्रसिद्ध अॅडव्होकेट महेश भाऊ फुंदे, डॉ. जितेंद्र गुप्ता, प्रमोद वलवे, समाजसेवक सुधिर बाळा करांदे, संदिप उगले, टायगर ग्रुप उल्हासनगर शहराध्यक्ष ईर्शाद शेख, राजेश करांदे, संतोष गवारे, रवि अडसुळ चंद्रकांत करांदे यांच्यासोबत गांवदेवी मित्र मंडळ व महिला मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, श्री साईनाथ पदयात्री मित्र मंडळ (शांतीनगर) श्री साईनाथ सेवा समिती (उल्हासनगर 5), नवतरुण मित्र मंडळ, विठ्ठल रुक्मिणी मंदिर (ब्राम्हणपाडा), के.टी.कट्टा ग्रुप शांतीनगर व जगदंबा मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत शेकडोच्या संख्येत सहभागी होऊन ब्राम्हणपाडा (उल्हासनगर ते श्री क्षेत्र शिर्डी 8 दिवसाची पदयात्रा करुन नववर्षाचे स्वागत साईच्या चरणी केले. तसेच दि. 4 जानेवारी रोजी भव्य मिरवणुकीचे देखील आयोजन करण्यात आले होते व रात्री 8 ते 10 साई भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. 
    उल्हासनगर शहर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ व इतर शहरातील अनेक नेते मंडळी, राजकिय नेते, समाजसेवक व साईभक्तांनी साईंच्या पालखी व पदयात्रेला यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले. अन्नदानची तसेच पदयात्रींची नोंदणी करण्याचे काम संतोष ढुकले, मयुर जामघरे, शेखर दळवी, नितेश उमरे, सन्नी करांदे, रविंद्र वाडेकर, चेतन निकम व मनोज टावरे या सर्व साई भक्तांनी केल्याचे समजते.
    अतिशय उत्साहात सर्व भक्तांनी उल्हासनगर ते श्री क्षेत्र शिर्डी पालखीचे आयोजन केल्याचे समजते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad