Header Ads

  • ताजा खबरें

    आज ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे मुरबाड तालुक्यात किर्तनाचे आयोजन

    today-hbp-nivrutra-deshmukh-indorekar-organizes-kirtan-in-murbad-taluka मुरबाड (बदलापूर विकास मिडिया)- आज मुरबाड तालुक्यातील प.पू. निर्मळनाथ महाराज गुरु मच्छिंद्रनाथ महाराज, श्री क्षेत्र खुटारवाडी आश्रम याठिकाणी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे किर्तन होणार असल्याचे समजते. 
    अनाथांचे नाथ श्री परमपूज्य बालयोगी मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने व आदेश गुरुदेव ट्रस्ट्या सहकार्याने मुरबाड तालुक्यात गुरुदत्त नवनाथ मंदिर आश्रम होणार असुन त्याचे भुमिपुजन आज आमदार किसन कथोरे, माजी आमदार गोटीराम पवार, कृष्णा म्हात्रे, ज्येष्ठ समाजसेवक नानजीभाई ठक्कर व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे तसेच कार्यक्रमाचे सुत्र संचालन भरत दळवी करणार आहेत. तसेच आलेल्या भक्तांसाठी सायंकाळी 4 वाजल्यापासुन ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त संख्येत भाविकांनी भुमीपुजन सोहळ्यात उपस्थित राहुन तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा तसेच इंदोरीकर यांचे किर्तनाला उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्षांनी केले आहे. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad