Header Ads

  • ताजा खबरें

    2019 नव्या वर्षातही रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार ; ठेकेदारकडून निकृष्ट दर्जाचे काम

    नव्या वर्षात रस्ताच्या कामात पुन्हा भ्रष्टाचार
    बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)ः- 2018 हा संपुर्ण वर्ष कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या विविध घोटाळ्यांमुळे तसेच निकृष्ट दर्जेच्या रस्त्यामुळे बदनाम झाला याने मुख्याधिकारी प्रशासनातील चुका सुधारुन 2019 या नव्या वर्षात कर भरणार्या नागरिकांना चांगली सुविधा पुरवुन त्यांना न्याय मिळवुन देतील अशी नववर्षानिमित्त बदलापुरातील नागरिकांना व सर्व करधारकांना अपेक्षा होती परंतु नववर्षाला बदलापुर पुर्व - गांधी चौक - चितळे आईस्क्रीम - काटदरे मंगल कार्यालय येथुन नगरपालिकेकडे - स्टेशन कडे  जाणार्या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरणाचे निकृष्ट दर्जाचे काम पाहुन कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे भ्रष्ट अभियंता, ठेकेदार व निविदेत टक्के खाणारे भ्रष्ट नगरसेवक सुधरणार नाही हेच लक्षात येत आहे.
    सुमार दर्जाच्या रस्त्याच्या कामाची माहिती सोशल मिडियावर
    सुमार दर्जाचा रस्ता केल्याने नागरिकांनी सोशल मिडियावर केली पोस्ट
    नुकतच सोशल मिडियावर समाजसेवक व उद्योजक महेश आपटे यांनी रस्त्याचे निकृ्ष्ट दर्जेच्या कामाचे फोटो पोस्ट केल्यानंतर संपुर्ण शहरात त्याविषयी चर्चा होत आहे.. याबाबत बदलापुर विकास च्या प्रतिनिशी ने चौकशी केली असता संपुर्ण काम हे अभियंत्याच्या देखरेखी खाली न झाले तसेच ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले असल्या निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे रात्री 8.30 च्या सुमारास रस्ता डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आले होते व मध्यरात्री 1 वाजता काम संपले. विशेष म्हणजे सकाळी त्याच डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर विविध ठिकाणी ठिगळे व क्रेक पडल्याने याही कामात ठेकेदार, भ्रष्ट अभियंते, अधिकारी व काही ठराव नगरसेवकांनी पैसे खाल्ल्याची शहरात चर्चा आहे.
    अतिशय कमी सामग्रीत रस्ता डांबरीकरण करतांनाचे चित्र
     सदर काम ज्या परिसरात झाले आहे तेथील नागरिकांनी आता कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना तक्रार केली असुन लवकरच या कामाची चौकशी करुन काम योग्य पद्धतीने न केल्यास मुख्याधिकारी यांना परिसरातील रहिवाशी घेराव घालतील असे बदलापुर विकासशी बोलतांना सांगितले.
    मागील कित्येक वर्ष आमच्या परिसरातील या रस्त्याचे काम रखडले होते आज त्या कामाला मुहुर्त मिळाल्यानंतर जर ठेकेदार निकृष्ट डांबरीकरण करणार असेल व अभियंता साईट पाहणी न करता अश्या निकृष्ट दर्जेच्या कामाला रिमार्क न करता पास करत असेल तर ते आम्हा रहिवाश्यांवर तसेच करधारकांवर अन्याय आहे.
    डांबरी रस्त्यावर 24 तासाच्या आत पडले क्रॅक
    डांबरी रस्त्यावर तासाच्या आत क्रेक
     नववर्षाला ज्या ठिकाणी ठेकेदाराने रस्ता डांबरीकरणाचे काम मध्यरात्री केले ते सुमार दर्जाचे काम असल्याने सदर डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता 24 तासापुर्वीच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. आताच ही अवस्था असेल तर भविष्यात किती दिवस हा रस्ता टिकणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad