महिला विशेष (लेडीज स्पेशल) लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याची महिला कांग्रेसची मागणी
ठाणे - देशातील पहिल्या महिला शिक्षिका व भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ठाणे शहर (जि) महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. शिल्पा सोनोने यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या वतीने, ठाणे रेल्वे स्टेशन मास्टर यांचेकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कल्याण ``महिला विशेष लोकल गाड्या'' महिला स्पेशल गाड्यांची संख्या (फे-या) वाढविणे बाबत निवेदन देवून मागणी करण्यात आली.
या निवेदनाद्वारे ठाणे रेल्वे स्टेशन मास्टर यांच्या निदर्शनास आणून दिले की, सकाळी व संध्याकाळी कामाला जाणा-या - येणा-या महिला भगिनीं, शाळकरी व कॉलेजच्या मुलींची संख्या खूप असल्याने लोकल गाड्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कल्याण ``महिला विशेष लोकल गाड्या'' महिला स्पेशल गाड्यांची संख्या कमी असल्याने आतोनात त्रास होतो.
तसेच, ठाणे, डोंबिवली, कल्याण ही ठिकाणी गर्दीची व महामुंबईला जोडणारी शहरे असल्याने रोजगारासाठी महिली भगिनींची व शाळा कॉलेजला जाण-या मुलींची संख्या प्रचंड असल्याने सद्या चालू असलेली महिला विशेष गाडी (लोकल) कल्याण ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल कडे जाणारी - येणारी एक गाडी (लोकल) आहे व संध्याकाळी जाणारी - येणारी एक गाडी (लोकल) आहे. त्यामुळे महिला भगिनींच्या संख्येच्या दृष्टीने महिला विशेष (लोकल) गाड्यांची संख्या फार कमी आहे. यामुळे महिलांना ये-जा करण्यासाठी दिरंगाई होते त्याचप्रमाणे त्यांना आतोनात त्रास ही होतो. महिला विशेष गाड्यांची संख्या वाढवावी.
तसेच हे निवेदन मा.ना.श्री. पियुष गोयल, रेल्वे मंत्री भारत सरकार यांना ``महिला विशेष लोकल गाड्या'' महिला स्पेशल गाड्यांची संख्या वाढवावी (फे-या वाढव्यावा) यासाठी ठाणे रेल्वे स्टेशन मास्टर यांच्याकडे सादर केले आहे. व त्यांना विनंती केली की आम्हां महिलांचे निवेदन त्यांच्याकडे आपल्या मार्फत पाठवावे.
No comments